For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाचन मंदिरेच सुजाण व सुसंस्कृत समाज घडवीत असतात

03:35 PM Apr 19, 2026 IST | अनुजा कुडतरकर
वाचन मंदिरेच सुजाण व सुसंस्कृत समाज घडवीत असतात
Advertisement

अभिनेते नंदकुमार पाटील यांचे प्रतिपादन ; श्रीराम वाचन मंदिराचा वर्धापन दिन संपन्न

Advertisement

सावंतवाडी : प्रतिनिधी

सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिर हे पावणे दोनशे वर्षे सातत्याने वाचकांची भूक भागविणारे आणि सुजाण नागरिक घडविणारे ज्ञान मंदिर आहे .ज्यांच्या नावानेच हे वाचन मंदिर संस्थान काळात सुरू झाले त्यांच्या वंशज या नगरीच्या नगराध्यक्ष झाल्याने वाचन मंदिरालाही उच्च दर्जा प्राप्त होईल असा आशावाद सुप्रसिद्ध अभिनेते नंदकुमार पाटील यांनी येथे व्यक्त केले. येथील श्रीराम वाचन मंदिराला १७४ वर्षे (स्थापना 18 मे 1852) पूर्ण झाल्याने वाचन मंदिराच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून वाचन मंदिरचे माजी अध्यक्ष ॲड. दीपक नेवगी यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबीयांकडून दिला जाणारा स्मृती पुरस्काराचे वितरण सोहळ्यात श्री पाटील प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर हे होते.यावेळी व्यासपीठावर कार्याध्यक्ष ॲड.संदीप निंबाळकर, सचिव रमेश बोंद्रे,सत्कारमूर्ती दादा राणे कोनस्कर ॲड .पी डी देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.यावेळी श्री पाटील यांनी वाचन मंदिराचे महात्म्य सांगून श्रीराम वाचन मंदिर हे मानवतेचे मंदिर असल्याने वाचन मंदिरेच सुजाण व सुसंस्कृत समाज घडवीत असतात मात्र अशा समाज घडविणाऱ्या ज्ञानमंदिराचे शासन अनुदान बंद करते ही दुर्दैवाची बाब असल्याचे स्पष्ट केले व लवकरच या मंदिराच अनुदान मंजूर होऊन निश्चितच उर्जितावस्था येईल अशी अपेक्षाही व्यक्त केली. ज्या दादा राणे कोनसकर यांना दिवंगत दीपक नेवगी यांच्या नावाचा पुरस्कार दिला गेला त्या दशावतार कलाकाराचे त्यांनी मनस्वी अभिनंदन करून कोणतीही लिखित स्क्रिप्ट अशा दशावतारकारांकडे नसताना अभिनयाचे बाळकडू उपजत असणाऱ्या या कलावंतानी ही दशावतार कला गेले अनेक वर्ष वारस हक्काने सुरू ठेवल्याने त्यांचे विशेष अभिनंदन केले . ऐकलेल्या ज्ञानावर आधारित अभिनय करणे हे अत्यंत कठीण काम असल्याचे सांगून आत्म सन्मानासाठी हे काम दशावतार कलाकार फारसं आर्थिक सुबत्ता नसतानाही आवडीने निष्ठेने करत असतात हे स्पष्ट केले. अभिनयावर बोलताना श्री पाटील यांनी अभिनय हा सर्व क्षेत्रात चालत असतो मात्र जो उत्तम अभिनय करतो तो यशस्वी कसा ठरतो याचे अनेक उदाहरणे देऊन व्यापारी असो अथवा शिक्षक असो वकील असो अथवा राजकारणी असो जो उत्तम अभिनय करतो तो जीवनात यशस्वी कसा होतो हे त्यांनी अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले.कलाकाराने केवळ स्पर्धेसाठी अथवा पुरस्कारासाठी काम न करता आनंदासाठी काम करावे असे आवाहन केले. त्यांनी रंगभूमी ही आत्मविश्वास देते हे सांगून एकांकिका ,नाटक, सिनेमा, जाहिराती यातील विविध टप्पे सांगून त्यातील अनेक खुमासदार किस्से ही स्पष्ट केले. कलाकारांना सामाजिक कृतज्ञेची भावना हवी हेही त्यांनी नमूद केले.सत्काराला उत्तर देताना दशावतार नटसम्राट दादा राणे कोनसकर यांनी दशावतार कलेचा आपला तीन पिढ्यांचा इतिहास सांगून वयाच्या अकराव्या वर्षी या कलेत आपण पदार्पण केल्यापासूनच असे सत्कार घडत असल्याचे स्पष्ट केले. आतापर्यंत अनेक जरी सत्कार झाले असले तरी या सत्कारात दर्जा असल्याचे त्यांनी स्पष्ट करून हा सत्कारच कायम लक्षात राहील हे त्यांनी स्पष्ट केले .दशावतार कला ही पोट भरण्याचे साधन नसून ती एक आत्मसन्मान देणारी कला आहे हे त्यांनी सांगून ही कला उर्जिता अवस्था येण्यासाठी कोणकोणत्या पातळीवर आपण कशा पद्धतीने झुंज दिले याचे अनेक उदाहरणे दिली. या कलेने आपणाला नाव दिलं हे त्याने स्पष्ट केले. व सत्कार याबाबत कृतज्ञता व्यक्त केली. ऍड. निंबाळकर यांनी प्रास्ताविक करून श्रीराम वाचन मंदिर इतिहास सांगून पावणे दोनशे वर्षे झालेल्या या वाचन मंदिराचा आढावा घेतला. हे वर्ष म्हणजे पावणे दोनशे वर्षाचे असल्याने सातत्याने कार्यक्रमाचे वर्ष असेल हे स्पष्ट केले. तर प्रसाद पावसकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ॲड.दीपक नेवगी यांच्या कुटुंबीयांनी पुरस्कृत केलेला हा पुरस्कार यावेळी एका जाणत्या राजाला दिल्याचे सांगून असच सहकार्य सर्वांनी द्यावं असे आवाहन केले. ॲड देसाई यांनी सत्कारमूर्ती दादा कोनस्कर यांचा गेल्या 35 वर्षाचा परिचय स्पष्ट केला. यावेळी सत्कारमूर्ती दादा आणि कोणास कर यांचा शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ सुमेधा नाईक धुरी यांनी केले तर आभार रमेश बोंद्रे यांनी केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.