For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Meera Borwankar | राज्य महिला आयोगाला मिळाली 'लेडी सुपरकॉप'; मीरा बोरवणकर यांची अध्यक्षपदी वर्णी

06:24 PM May 04, 2026 IST | NEETA POTDAR
meera borwankar   राज्य महिला आयोगाला मिळाली  लेडी सुपरकॉप   मीरा बोरवणकर यांची अध्यक्षपदी वर्णी
Advertisement

               मीरा बोरवणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड

Advertisement

मुंबई: आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे 'लेडी सुपरकॉप' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. प्रशासकीय आणि पोलीस दलातील प्रदीर्घ अनुभवाचा फायदा आता राज्यातील महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी होणार आहे.

मीरा बोरवणकर या भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अत्यंत वरिष्ठ आणि अनुभवी अधिकारी आहेत. १९८१ च्या बॅचच्या अधिकारी असलेल्या बोरवणकर यांनी महाराष्ट्र केडरच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी होण्याचा मान पटकावला होता. त्यांच्या पोलीस दलातील कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा छडा लावून गुन्हेगारांवर वचक निर्माण केला होता.

Advertisement

पोलीस दलातील विविध उच्च पदे भूषवल्यानंतर आता त्यांच्याकडे राज्य महिला आयोगाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महिलांचे हक्क, संरक्षण आणि सक्षमीकरण या क्षेत्रांत त्यांच्या निवडीमुळे मोठी सकारात्मक भर पडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या या नियुक्तीचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

Advertisement
Tags :

.