सरपंच हत्या प्रकरणात राज्य सरकारने चांगली कारवाई केली,एकही आरोपीला सोडणार नाही - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
कोल्हापूर
शिरोळ येथील पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सवाच्या उद्घाटानानिमित्त मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या संवाद साधला.
याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस HMPV वायरस बद्दल बोलताना म्हणाले, प्राथमिक माहितीनुसार हा व्हायरस नवीन नाही यापूर्वी देखील हा व्हायरस आलेला आहे. या व्हायरस संदर्भात जे काय मार्गदर्शक सूचना आहेत त्या लवकरच जारी करू. केंद्र सरकारचे आरोग्य मंत्रालय सर्व राज्यांसोबत बैठक घेणार आहे. लगेच सर्वांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. आज राज्यातील आरोग्य विभागाची बैठक झाली आहे केंद्रीय आरोग्य विभागाची बैठकदेखील सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
यावेळी पुढे बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या सर्व प्रकरणात राज्य सरकारने चांगल्या पद्धतीने कारवाई केलेली आहे. कुठेही मागे हटलेलो नाही, मागे हटणार नाही आणि कोणाला सोडणार नाही. कोणी कोणाला धमकी देण्याचा प्रयत्न केला तर त्याला देखील सोडणार नाही.