कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

टॅक्सीमालकांच्या हितासाठी 10 सप्टेंबरपर्यंत राज्य धोरण

01:21 PM Aug 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा : टॅक्सीमालकांनी मांडल्या अनेक समस्या

Advertisement

पणजी : राज्यातील टॅक्सी मालकांशी बैठक घेण्यात आली असून, त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आलेल्या आहेत. सरकारने यापूर्वीही पारंपरिक टॅक्सी मालकांवर अन्याय केलेला नाही आणि यापुढेही होणार नाही. येत्या 10 सप्टेंबरपर्यंत सरकार टॅक्सी मालकांचे प्रश्न सोडविणार असल्याने वाहतुकीशी संबंधित ‘राज्य धोरण’ आणणार आहे. या धोरणानुसार, किनारी भागातील टॅक्सी व्यावसायिक असो किंवा फोंडा, सांखळी, केपे, सांगे आदी भागात टॅक्सी व्यवसाय करणारा असो, सर्वांचे व्यवसाय सुरू राहण्यासाठी हे राज्य धोरण असेल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बैठकीनंतर पत्रकारांना दिली.

Advertisement

राज्यात अनेक वर्षांपासून स्थानिक टॅक्सी व्यावसायिक व मालक पर्यटकांना उत्तम सेवा देण्याचे काम करीत आहेत. तरीही सरकारकडून ओला, उबर तसेच अन्य अॅप आधारीत टॅक्सी सेवा सुरू करण्याचा रेटा लावला आहे. आम्हाला अॅप आधारीत टॅक्सी सेवा देणे परवडणारे नसल्याने ही सेवा नकोच, अशी मागणी करीत राज्यातील टॅक्सी मालकांनी काल शुक्रवारी पर्वरी मंत्रालयासमोर गर्दी केली.

टॅक्सीमालक मोठ्या संख्येने येणार असल्याचा अंदाज लागताच पोलिसांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारांवर कडक बंदोबस्त ठेवला होता. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी टॅक्सी मालकांची बैठक बोलविल्यानंतर या बैठकीला अपेक्षापेक्षा अधिक टॅक्सीमालक उपस्थित राहिल्याने सर्वांशी संवाद न साधता काही टॅक्सी मालकांसमवेत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. बैठकीला वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार मायकल लोबो, आमदार दिलायला लोबो, आमदार अॅल्टन डिकॉस्टा, आमदार वेन्झी व्हिएगस, आदी उपस्थित होते. टॅक्सीमालकांशी बैठक घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी टॅक्सी वाहतूक राज्य धोरण सप्टेंबरध्ये जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले.

टॅक्सी व्यावसायिकांचे रक्षण करा : विरोधक 

गोवा वाहतूक मार्गदर्शक तत्त्वे 2025 रद्द करून सरकारने पारंपरिक टॅक्सी व्यावसायिकांचे रक्षण करायला हवे. सरकारने 10 सप्टेंबरपर्यंत टॅक्सी राज्य धोरणाचा राज्य मसुदा दिलेल्या आश्वासनाप्रमाणे प्रसिद्ध करावा. कारण पारंपरिक टॅक्सी व्यवसायाचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांना जाचक ठरणारी गोवा वाहतूक मार्गदर्शक तत्त्वे 2025 रद्द करावीत, मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकोस्टा आणि आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी बैठकीनंतर केली.

धोरण करावेच लागेल : मायकल लोबो

आपल्याला आमचे टॅक्सी व्यवसायासंबंधी धोरण तयार करावे लागेल आणि डिजिटल प्लॅटफॉर्म सुनिश्चित करावा लागेल. आमचे टॅक्सी ऑपरेटर डिजिटल प्लॅटफॉर्मवर दर निश्चित करण्यास सहमत झाले आहेत. त्यामुळे स्वत:चे आमचे राज्य धोरण तयार करण्यासंबंधी मी मुख्यमंत्र्यांना कळवले आहे. आजची बैठक यशस्वी झाली आणि आम्हाला विश्वास आहे की यातून एक उपाय निघेल. पारदर्शकता, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि समान किंमत यावर लक्ष केंद्रित केले जाईल. पुढील बैठक नवीन मसुद्यासह होईल कारण सिद्ध मसुदा रद्द करण्याइतकाच चांगला असेल, असे आमदार मायकल लोबो म्हणाले.

टॅक्सीमालकांसाठी नवे धोरण : डिलायला

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमवेत टॅक्सी मालकांची झालेली बैठक ही यशस्वी ठरली. कारण 10 सप्टेंबरपर्यंत सरकार टॅक्सी धोरणाचा एक नवीन मसुदा सादर करणार आहे, जो स्थानिक टॅक्सी मालकांसाठी उत्तम असेल. सरकार नवीन धोरण लागू करेपर्यंत विद्यमान धोरण रद्द करण्याची शक्यता आहे, असे आमदार दिलायला लोबो म्हणाल्या.

टॅक्सीमालक समाधानी नाहीत : डिकॉस्टा

10 सप्टेंबर रोजी सरकार टॅक्सी धोरणाचा नवीन मसुदा सादर करेल. तोपर्यंत विद्यमान धोरण कायम राहील. टॅक्सी ऑपरेटर्सची मुख्य मागणी पूर्ण झालेली नसल्यामुळे ते या बैठकीबद्दल समाधानी आहेत असे मला वाटत नाही, असे आमदार अॅल्टन डिकॉस्टा म्हणाले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article