For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur : कोल्हापूर जिल्हा परिषद शाळांमध्ये अत्याधुनिक ‘स्कूल हेल्थ कॉम्प्लेक्स’ची सुरुवात

12:46 PM Jan 08, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur   कोल्हापूर जिल्हा परिषद शाळांमध्ये अत्याधुनिक ‘स्कूल हेल्थ कॉम्प्लेक्स’ची सुरुवात
Advertisement

                          विद्यार्थिनींच्या आरोग्यासाठी कोल्हापूर मॉडेल स्वच्छतागृह योजना

Advertisement

कोल्हापूर : कोल्हापूरजिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक दर्जाची स्वच्छतागृहे उपलब्ध व्हावीत, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या माध्यमातून कोल्हापूर स्टाईल इंटिग्रेटेड स्कूल हेल्थ का म्प्लेक्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याबाबतची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकयन एस. यांनी पत्रकार परिषदेत दिली. कार्तिकयन एस. म्हणाले, एका विद्यार्थिनीला शाळेत योग्य स्वच्छता सुविधा न मिळाल्यामुळे तिच्या आरोग्यावर परिणाम झाला. या घटनेने संपूर्ण जिल्हा परिषदेचे आणि शिक्षण विभागाचे लक्ष वेधले गेले.

शाळेची इमारत महत्त्वाची आहेच पण विद्यार्थ्यांसाठी विशेषतः मुलींसाठी स्वच्छता सुविधा त्याहूनही अधिक महत्त्वाच्या आहेत. त्यामुळेच कोल्हापूर स्टाईल इंटिग्रेटेड स्कूल काम्प्लेक्सची संकल्पना अस्तित्वात आली.प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेने एक ठोस आणि संवेदनशील आराखडा तयार केला. या प्रकल्पासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाने आणि पंधराव्या वित्त आयोगातून हा उपक्रम राबवण्यात आला.हा निधी ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या आणि विशेषतः मुलींची उपस्थिती जास्त आहे. त्या शाळांमध्ये आधुनिक स्वच्छता सुविधा निर्माण करण्यासाठी वापरण्यात आला.

Advertisement

हेल्थ कॉम्लेक्सचे तीन प्रकार

निकषानुसार हेल्थ कॉम्प्लेक्सचे तीन प्रकार निश्चित करण्यात आले. २०० पेक्षा जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये ए टाईप, १०० ते २०० विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये बी टाईप आणि शंभरपेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये सी टाईप कॉ हेल्थ करण्यात आले. या प्रकल्पात वापरलेले साहित्य टिकाऊ, सौंदर्यपूर्ण आणि नामवंत कंपनीचे आहे. फिनोलेक्स, जैन, किसान पाईप, पॉलीकॅब, सिस्का बल्ब, कजारिया, जॉन्सन सिम्पलो टाइल्स, ग्रॅ. नाईट पार्टिशन जक्वार, कोल्हार या ब्रेडेड कंपन्यांचे साहित्य वापरण्यात आले

मार्चपर्यंत १०० शाळांमध्ये

एकंदरीत, विद्यार्थ्यांना चांगल्या वातावरणात शिक्षण घेता यावे हा उद्देश यामागे असल्याचे कार्तिकीयन.एस यांनी सांगितले. सध्या ५४ शाळांमध्ये स्वच्छतगृहांच्या आधुनिक सुविधा देण्यात आल्या असून मार्चपर्यंत १०० शाळांमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचे कार्तिकयन एस. यांनी सांगितले. या स्वच्छता गृहांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच मनरेगातूनही देखभाल केली जाणार आहे. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मिना शेंडकर उपस्थित होत्या..

Advertisement
Tags :

.