कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राज्यस्तरीय स्केटींग स्पर्धा उद्या

12:00 PM Nov 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : कर्नाटक पदवीपूर्व शिक्षण खाते,उपसंचालक शालेय शिक्षण विभाग बेळगाव व जीएसएस महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पदवीपूर्व महाविद्यालयीन एसजीएफआय स्केटींग स्पर्धा बुधवार दि. 26 रोजी आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत एस. एम. देसाई यांनी दिली. या पत्रकार परिषदेत नागराज मऱ्याणकर, एम. बी. शिरसाळ, प्रभू शिवनायकर, जीवन पाटील आदी उपस्थित हेते. देसाई पुढे म्हणाले, संपूर्ण राज्यातून जवळपास 100 हून अधिक स्केटींगपटू, पालक व स्वयंसेवक व महाविद्यालयीन कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. 16 रोजी सकाळी 6 ते 9.30 या वेळेत मालिनी सिटी येडियुराप्पा मार्ग पी. बी. रोड येथे रोडरेसच्या स्पर्धा भरविल्या जाणार आहेत. सकाळी 10.30 ते 5 या वेळेत ओमनगर येथील शिवगंगा स्केटींग रिंगवरती  सात विविध प्रकारच्या स्पर्धा भरविल्या जाणार आहेत. सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंची राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली आहे. यावेळी पदवीपूर्व महाविद्यालयाचे क्रीडा निर्देशक, उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article