खानापूर ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या खो खो संघाची राज्यस्तरीय निवड
खानापूर : मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या खो खो संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. बैलहोंगल येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेत उपांत्यपूर्व सामन्यात बेळगाव ज्योती महाविद्यालयाचा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अंतिम फेरीत सौंदत्ती पदवीपूर्व महाविद्यालयाचा पराभव करुन जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून मंड्या येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ताराराणी महाविद्यालयाच्या खो खो संघातील निवड झालेल्या खेळाडू निलम कक्केरकर (कर्णधार), लक्ष्मी हंगिरकर, अपेक्षा निलजकर, साक्षी देवलतकर, वैष्णवी पाटील, प्रणाली पाटील, कावेरी अंधारे, सरस्वती व•sबैलकर, विश्रांती मेलगे, मंगल देवलतकर, रेणुका तोरगल आणि ईश्वरी या सर्व खेळाडूंनी आपल्या अव्वल खेळाचे प्रदर्शन केले. प्रशिक्षक प्रशांत पाखरे, मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराजू, क्रीडा प्रमुख प्रा. श्रीमती एम. वाय. देसाई यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभत आहे.