Kolhapur : शिवाजी विद्यापीठात राज्यस्तरीय पॅरा अॅथलेटिक्सची धमाकेदार सुरुवात
राज्यस्तरीय पॅरा अॅथलेटिक्सला उत्साह
कोल्हापूर : दिव्यांग खेळाडुची जिद्द आणि कौशल्याला व्यासपिठ मिळवून देणाऱ्या ५ व्या राज्यस्तरीय पॅरा अॅथलेटिक्स क्रीडा स्पर्धाचे आयोजन शिवाजी विद्यापिठातील सिंथेटिक मैदानावर होत असुन सदरची स्पर्धा ही दोन दिवस चालणार असुन यास्पर्धेत दिव्यांग खेळाडु सहभागी होत आपले कौशल्य दाखवणार आहेत.
यास्पर्धेचे आयोजन हे पॅरालिंपिक स्पोटर्स असोसिएशन कोल्हापूर ने आयोजन केले आहे.स्पर्धेचे उघाटन शुक्रवार रोजी सकाळी १० वाजता झाले. त्याच बरोबर प्रहार अपंग क्रांती च्या वतीने जागतिक अपंग दिना निमित्त दिव्यांग कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात दिव्यांगाच्या साठी चित्रकला, रांगोळी कराओके स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा रविवार दि.३० नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते ४ यावेळेत पॅव्हेलियन मैदान कसबा बावडा येथे होणार आहेत.
हम भी कुछ कम नही....
पॅरालिंम्पिक स्पोर्टस असोसिएशन महाराष्ट्र आणि कोल्हापूर च्या वतिने शिवाजी विद्यापिठाच्या सिंथेटिक मैदानावर सुरू असलेल्या ५ व्या राज्यस्तरीय पॅरा अॅथलेटीक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत आपल्या दिव्यांगावर मात करत, न्युनगंड बाजुला सारत आपल्या क्रीडा कौश्यल्याचे उत्तम सादरीकरण करत दिव्यांग खेळाडु मैदान गाजवत आहेत. या स्पर्धेसाठी राज्यभरातुन ४५० हुन अधिक दिव्यांग खेळाडु सहभागी झाले असुन. ते धावणे, लांब उडी, गोळा फेक, भाला फेक आदी क्रीडा प कारात नैप्युन्य दाखवत. हम भी कुछ कम नही चा संदेश दिला.