परुळेत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन
परूळे / प्रतिनिधी
सातत्याने 34 वर्ष एकांकिका स्पर्धा सुरू ठेवणे यामागचा प्रामाणिक हेतू आहे तो म्हणजे या व्यासपीठावरून नवनवीन कलाकार निर्माण व्हावेत आणि मंडळाच्या या उपक्रमाला एकांकिका सादर करणाऱ्या प्रत्येक कलाकाराने प्रामाणिकपणे आपली कला सादर करून आपल्या कलागुणांना वाव द्यावा. नी पक्ष आणि दर्जेदार परीक्षण करण्याची जबाबदारी आपली असल्याचे मत प्रसिद्ध नाट्यकर्मी रवीदर्शन कुलकर्णी यांनी उद्घाटन सोहळ्याच्या वेळी केले यावेळी रविदर्शन कुलकर्णी किरणसिंह चव्हाण अविनाश देसाई, रमाकांत सामंत, जयवंत राऊळ हनुमंत्त तेली पत्रकार भुषण देसाई, संजय सामंत, पत्रकार शंकर घोगळे, राधाकृष्ण फाउंडेशनच्या सौ.अरुणा सामंत आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रथमेश नाईक यांनी केले तर स्वागत डॉ प्रशांत सामंत केले यावेळी अजित परुळेकर, सचिन सामंत, संतोष सामंत पुरुषोत्तम प्रभू, अमेय देसाई मयुरेश वाडेकर , गोपाळ राऊळ,आनंद नानचे सुनील माड्ये आदी उपस्थित होते.