आचरा येथे 28 नोव्हेंबरला राज्यस्तरीय समूहनृत्य स्पर्धा
आदर्श आचरा व्यापारी संघटनेतर्फे कार्यक्रमाचे आयोजन
आचरा । प्रतिनिधी
आचरा येथील आदर्श व्यापारी संघटना आचरातर्फे 28 नोव्हेंबर रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने भव्य खुली राज्यस्तरीय समूह नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा होणार असून दुपारी १२ वाजता आरती, १ वाजता तीर्थप्रसाद व महाप्रसाद. संध्याकाळी ६ वाजता स्थानिक भजने होणार आहेत. रात्रौ ९ वाजता भव्य खुली राज्यस्तरीय समूह नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यासाठी प्रथम पारितोषिक २५०००/– व चषक, द्वितीय पारितोषिक १५०००/– व चषक, तृतीय पारितोषिक १००००/– व चषक, उत्तेजनार्थ प्रथम ४०००/– व चषक, उत्तेजनार्थ द्वितीय ४०००/– व चषक अशी बक्षीसे ठेवण्यात आली आहे. स्पर्धेत आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी संपर्क :– पंकज –९४२०७२६४६७, विजय –९४२१५७४७०० यांना करण्याचे आवाहन व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.