For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

कुडाळात 28 जानेवारीला राज्यस्तरीय बैलगाडी शर्यत

12:45 PM Jan 16, 2024 IST | अनुजा कुडतरकर
कुडाळात 28 जानेवारीला राज्यस्तरीय बैलगाडी शर्यत

कुडाळ -

Advertisement

कुडाळ तालुक्यातील पावशी येथील सामाजिक कार्यकर्ते अभिषेक चंद्रकांत वाटवे यांच्यावतीने 28 जानेवारी रोजी राज्यस्तरीय " सिंधुदुर्ग केसरी" बैलगाडी शर्यत 2024 स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धा दुपारी 1 वाजता पावशी मिटक्याचीवाडी (गावडे पाचा ) येथील मैदानावर होणार आहे. प्रथम क्रमांक 25 हजार रुपये ,द्वितीय 20 हजार रुपये ,तृतीय 15 हजार रुपये , चौथा 12 हजार रुपये ,पाचवा 10 हजार रुपये,सहावा 9 हजार रुपये, सातवा 8 हजार रुपये ,आठवा 7 हजार रुपये,नववा 6 हजार रुपये,दहावा 5 हजार रुपये,अकरावा 4हजार रुपये,बारावा तीन हजार रुपये,तेरावा 2500 रुपये, चौदावा 2 हजार रुपये,पंधरावा 1500 रुपये व प्रयेकी ढाल अशी बक्षिसे आहेत. तसेच उत्कृष्ट जकी , उत्कृष्ट जोडी याना प्रत्येकी 2 हजार रुपये व ढाल अशी बक्षीसे देण्यात येतील.अधिक माहितीसाठी अभिषेक वाटवे मोबा. 9545463563 यांच्याशी संपर्क साधावा.

Advertisement
Advertisement
Tags :
×

.