महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महाराष्ट्रात महिषासुराच्या अवलादी जन्मल्या...शासन आपल्या दारी ही केवळ शोबाजी

03:35 PM Feb 08, 2024 IST | Abhijeet Khandekar
Ambadas Danve visit Kolhapur
Advertisement

महाराष्ट्रात महिषासुराचा अवलादी जन्मल्या असून त्यांचं निर्दालन करण्यासाठी अंबाबाईच्या चरणी प्रार्थना केली असल्याचं विधान राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं आहे. सरकारची शासन आपल्या दारी ही योजना सरकारी यंत्रणा आणि जाहीरातींचा वापर करून केलेला दिखाऊपणा असून सरकारकडून केवळ शोबाजी सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Advertisement

राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये ते शासन आपल्या दारी या शासनाच्या समांतर असा जनता दरबार घेऊन जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला.

Advertisement

आज सकाळी कोल्हापूरमध्ये उतरल्यावर त्यांनी करवीर निवासिनी अंबाबाई यांचं दर्शन घेतलं. मंदिरात माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "महाराष्ट्रात महिषासुराच्या अवलादी जन्मल्या आहेत. त्यांचं निर्धालन करण्याची शक्ती आमच्या मनामध्ये द्यावी अशी अंबाबाईची चरणी प्रार्थना केलेली आहे. शिवसेना आणि शिवसैनिकाला ऊर्जा प्राप्त होईल" असेही त्यांनी म्हटले आहे.

शासनाच्या शासन आपल्या दारी या योजनेवर टिका करताना ते म्हणाले, "शासन आपल्या दारी ही एक फसवी योजना आहे. सरकारी यंत्रणा आणि जाहिरातींचा वापर करून केलेली शोबाजी आहे. शासनाचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम केवळ भास आणि बोगस कार्यक्रम आहे." असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निकालावर बोलताना ते म्हणाले, "या निकालामध्ये अंपायर वगैरे सगळे ठरलेले होते. केवळ हात कधी वर करायचा बाकी होतं. तो त्यांनी परवा केला. शिवसेनेच्या बाबतीत काय घडलं ते जगाला आणि राज्याला माहित आहे. तशी राष्ट्रवादी काँग्रेस ही कोणाची आहे सर्वांना माहीत आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी असताना बहुमताच्या जोरावर अशा पद्धतीचा निकाल दिला. लोकशाही पूर्णपणे गुंडाळून ठेवण्यात आली आहे. निवडणूक आयोग हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात काम करणारा नोकर झाला आहे." असाही आरोप त्यांनी केला.

सरकारवर टिका करताना त्यांनी "मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांना धमकी देण्याची क्षमता नाही. तर देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आता काही राहीलेलं नाही. हे शाहू फुले आंबेडकरांचा राज्य नाही तर गुंडांचं राज्य बनलेलं आहे." असा गंभिर आरोप त्यांनी केला.

Advertisement
Tags :
Ambadas Danve visit KolhapurLeader Oppositiontarun bharat news
Next Article