For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ड्रग्जविरोधात राज्य सरकारची कठोर भूमिका

11:12 AM Dec 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
ड्रग्जविरोधात राज्य सरकारची कठोर भूमिका
Advertisement

गृहमंत्री डॉ. परमेश्वर विधानपरिषदेत माहिती

Advertisement

बेळगाव : राज्य सरकार अमली पदार्थविरोधी कठोर पावले उचलत आहे. मुख्यमंत्र्यांनी कर्नाटक ड्रग्जमुक्त करण्याची घोषण केली आहे. त्यानुसार उपाययोजना करण्यात येत असून गेल्या तीन वर्षांत सुमारे 20 हजारहून अधिक fिकलो ड्रग्ज जप्त केले आहे. तसेच 300 अधिक विदेशी युवकांची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेतले आहे. राज्य सरकारने ड्रग्जविरोधात तीव्र लढा उभारला असून पोलीस खाते यावर कठोर पावले उचलत आहे, अशी माहिती गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी दिली.

विधानपरिषद सदस्य केशव प्रसाद एस. यांनी गुरुवारी प्रश्नोत्तर तासात राज्यात अमली पदार्थांची तस्करी वाढली असून गांजाचाही पुरवठा वाढला आहे. यावर राज्य सरकार कोणती कारवाई करत आहे, असा प्रश्न केला होता. यावर गृहमंत्री जी. परमेश्वर म्हणाले, 2023 मध्ये 10,487 किलो, 2024 मध्ये 6,670 किलो, 2025 मध्ये 5,770 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. ड्रग्जविरोधात कारवाई करण्यासाठी अमली पदार्थ विरोधी पथक स्थापन करण्यात आले आहे, तसेच पोलीस अधिकाऱ्यांना राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांमध्ये भेट देऊन तेथील माहिती घेण्याची सूचना केली आहे, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

कारणीभूत अधिकाऱ्यांवर निलंबनाचीही कारवाई

विधानपरिषद सदस्य किशोरकुमार पुत्तूर यांनी कारागृहातील कैद्यांची शाही बडदास्त ठेवण्यात येत आहे. यावर राज्य सरकारने कोणती कारवाई केली, असा प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना गृहमंत्री परमेश्वर म्हणाले, कारागृहात अशा घटना नव्या नाहीत. पण आम्ही अशा घटना घडू नये यासाठी उपाययोजना केल्या असून प्रसंगी अधिकाऱ्यांवर निलंबनाचीही कारवाई केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

चार दिवसांत विविध ठिकाणी छापे

कारागृह विभागाच्या नव्या डीजीपींनी पदभार स्वीकारल्यानंतर चार दिवसांत विविध ठिकाणी छापे टाकून कारागृहातून 50 ते 60 मोबाईल व चाकू जप्त केले आहेत. यातून एवढेच समजते की राज्य सरकार कारागृहातील अवैध कृत्यांवर आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते, असे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.