Umerga News | उमरग्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे रणशिंग; प्रलंबित मागण्यांसाठी 'बेमुदत संप' सुरू!
शासनाच्या उदासीनतेविरोधात कर्मचारी आक्रमक
उमरगा - आपल्या विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत संप सुरू केला आहे. राज्यभरातील १७ लाख सरकारी कर्मचारी आपल्या प्रलंचित मागण्यांसाठी धरणे, वॉक आऊट, राज्यव्यापी निदर्शन, निदर्शन, साखळी उपोषण अशा विविध माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी देखील शासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे समन्वय समितीने बेमुदत संप पुकारला आहे.
या संपात तालुक्यातील शेकडो कर्मचारी सहभागी झाले आहेत, अशी माहिती उमरगा तालुका संघटनेचे भगवान गायकवाड यांनी दिली. संपकरी कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर निदर्शन केली. यामध्ये तालुकाध्यक्ष भागवत गायकवाड, नेताजी गायकवाड गजानन नरवडे, मकबूल शेख, दत्तात्रय सूर्यवंशी, मनीषा कदम, दीपक चव्हाण, मनोज यमुलवाड,शिवराज खुर्रे महेश कानडे कैलास ठमके, संजय कोकाटे, निकिता सांगवे, गुणाजी ढोणे, शिवशंकर मंडले, प्रकाश शिंदे, गौरी कांबळे, बालाजी पांचाळ, मधुकर पाटील आदी उपस्थित होते.
-मागण्यांबाबत सकारात्मक ठोस निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा. शासनाशी सलोखा सुसंवाद ठेवून प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत, अशी आंदोलकांनी मागणी केली आहे. सर्वच मागण्यांबाबत शासन दुर्लवा करीत असल्याचे वास्राव आमच्यासमोर उभे आहे. असे आंदोलकांचे म्हणणे आहे.