For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेतकरीवर्गाच्या दिमतीला राज्य सरकार

02:43 PM Apr 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
शेतकरीवर्गाच्या दिमतीला राज्य सरकार
Advertisement

विविध योजनांमुळे स्वास्थ्य; आत्महत्येचे प्रमाण घटले : शेतीसाठी अनुकूल हवामान कारणीभूत

Advertisement

बेळगाव : शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे शक्य न झाल्याने नैराश्येतून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली होती. या प्रकाराबद्दल सरकारने चिंता व्यक्त केली होती. एक खुषखबर नुकतीच हाती आली असून, बेळगाव जिह्याबरोबर संपूर्ण राज्यातच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी झाले आहे. शेतीसाठी अनुकूल हवामान आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने विविध योजना राबविल्यांमुळे शेतकऱ्यांना स्वास्थ्य मिळाले आहे.

शेती हा पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असलेला व्यवसाय आहे. शेतकऱ्य़ांना अनेकदा लहरी हवामानाशी सामना करावा लागतो. बियाणे, खते, शेतमजुरी, शेती साठी लागणाऱ्या सामुग्रींचे भाडे यांचा ताळमेळ घालताना शेतकऱ्यांना काहीवेळा डोईजड ठरत असते. अनेक शेतकरी बँका, सोसायटी यासारख्या आर्थिक  स्रोतांकडून कर्ज घेललेले असतात. अपेक्षेप्रमाणे उत्पादन हाती आल्यास शेतकऱ्यांना सर्व खर्च भागवून उर्वरित पैसा उपजीविका चालविण्यासाठी उपयोगी ठरू शकतो. ताळमेळ न बसल्यास शेतकऱ्यांचा समतोल ढासळतो. अशावेळी सरकारकडून काही मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची असते.

Advertisement

शेतमजुरांचा तुटवडा एक समस्या

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची गांभीर्याने दखल घेतलेल्या राज्य सरकारने विविध योजना आणि कार्यक्रम राबवून शेतकऱ्यांत स्थैर्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आज शेतमजुरांचा तुटवडा ही आणखी एक समस्या आहे.

सत्तापालट झाली तरी योजना कायम राहाव्यात

त्याचप्रमाणे कृषी उत्पादन प्रक्रिया योजना, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, जैविक कीटकनाशकावर सवलत, तृणधान्य उत्पादनासाठी प्रोत्साहन अशा योजनाही शेतकऱ्यांच्या दिमतीला आहेत. पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत, पीक भरपाई, कृषीसातत्य निधी, कृषीभाग्य, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अशा योजनांचा उल्लेख करता येईल. एकूणच शेतकऱ्यांच्या मदतीला राज्य सरकारबरोबर केंद्रही आहे. राज्यात असो किंवा केंद्रात सत्तापालट झाली तरी शेती व शेतकऱ्यांसाठी योजना कायम राहाव्यात, अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरणार नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाणही आणखी कमी होईल, असे तज्ञांचे मत आहे.

671 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद

2022-23 मध्ये राज्यात 1049 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. 2023-24 मध्ये 1252, 2024-25 मध्ये 1194 शेतकऱ्यांच्या आत्महत्येची प्रकरणे घडली होती. तर 2025-26 मध्ये ही संख्या जवळजवळ 50 टक्क्याने कमी झाली. याकाळात 671 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे.

Advertisement
Tags :

.