For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Miraj Excise Department मिरज पथकाने गोवा मेड बनावट दारुचा ७१ लाखांचा मुद्देमाल जप्त

02:06 PM Mar 03, 2026 IST | NEETA POTDAR
miraj excise department मिरज पथकाने गोवा मेड बनावट दारुचा ७१ लाखांचा मुद्देमाल जप्त
Advertisement

        रत्नागिरी-नागपूर महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

Advertisement

मिरज -राज्य उत्पादन शुल्क विभाग मिरजच्या पथकाने रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील म्हैसाळ फाट्यावर गोवामेड दारुची कंटेनरमधून तस्करी सुरु असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. यावेळी ४६ लाख, ३६ हजारच्या दारु साठ्यासह ३० लाखांचा कंटेनर असा ७१ लाख ३६ हजारचा मुद्देमाल जप्त केला. सदर दारु नागपूरला जात असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी संशयित लभजीत गुरमेजसिंह (रा. पिलभित, उत्तर प्रदेश) याला अटक करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला त्यांच्या गुप्त खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी सातच्या सुमारास रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरुन कंटेनरमधून गोवामेड दारु बाहतूक केली जाणार असल्याचे समजले.त्यानुसार पोलिसांनी महामार्गावरीलमिरज जप्त केलेला वारुचा मुद्देमाल व अटक असलेल्या आरोपीसोबत उत्पादन शुल्क विभागाचे पोलिसम्हैसाळ फाट्याजवळ सापळा लावला. यावेळी (एमएच-४०-सीटी-२८१४) या १६ वाकी कंटेनरमधून गोवा मेड बनावट देशी दारूचा साठा महसूल चुकवून विक्रीसाठी नागपूरला जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अधिकाऱ्यांनी चालकास कंटेनर थांबविण्यास सांगितले व त्याच्याकडे चौकशी केली. कंटेनरची तपासणी केली असता सदर कंटेनरमध्ये कोंकण संत्रा, रॉकेट संत्रा, सिमला संत्रा,गोवा नंबर एक संत्रा, आदी विविध गोवा मेड बनाबट देशी दारूचा ४१ लाख ३६ हजार रुपये किमतीचा साठा हस्तगत करण्यात आला आहे.

Advertisement

तीन प्रकारच्या बनावट औषधांची बिले मिळून आली आहेत. त्यामध्ये अरिष्टो फार्मासिटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड भोपाळ, मध्य प्रदेश, निकिता फार्मासिटिकल्स स्पेशालिटीज प्रायव्हेट लिमिटेड नागपूर आणि मे. रुसन फार्मासिटिकल्स प्रायव्हेटलिमिटेड अंकलेश्वर, गुजरात या कंपन्यांची नावाची बनावट औषधांची बिले मिळून आली आहेत. सदर गुन्ह्यात एकूण मुद्देमाल व वाहनांसह एकूण ७१ लाख ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी संशयित चालक लभजीत गुरमेजसिंह याची चौकशी केली असता त्याने आपल्या जबाबात बनावट गोवामेड देशी दारूचा साठा हा गोव्यातून आणला असून, तो महाराष्ट्राचा महसूल चुकवुन नागपूर येथे घेऊन जात असल्याचे सांगितले आहे. सदर कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग मिरजचे निरीक्षक दीपक सुपे, दुय्यम निरीक्षक लक्ष्मण पवार, अजय लोंढे, जयसिंग खुटावळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक इरफान शेख, विनायक खांडेकर, स्वप्निल कांबळे, श्रीमती कविता सुपणे, श्रीमती शाहीन शेख आदींनी भाग घेतला. अधिक तपास निरीक्षक दीपक सुपे करीत आहेत.

Advertisement

.