For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara Crime | साताऱ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा धडाका; ४१ लाखांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त!

04:46 PM May 03, 2026 IST | NEETA POTDAR
satara crime   साताऱ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा धडाका  ४१ लाखांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त
Advertisement

                               साताऱ्यात गोवा बनावटी दारूचा मोठा साठा जप्त

Advertisement

सातारा - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सातारा येथे गोवा बनावटीच्या विदेशी मद्य व बिअरच्या अवैध वाहतुकीवर मोठी कारवाई करत सुमारे ४१ लाख ७५ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई १ मे रोजी पुणे आशियाई महामार्गावर शेंद्रे (ता. जि. सातारा) येथे सापळा रचून करण्यात आली.

या कारवाईदरम्यान महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेले गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य व बिअर चोरट्या मागनि वाहतूक करताना आढळून आले. पथकाने १७१ बॉक्स विदेशी मद्य व ५० बॉक्स बिअर असा एकूण २२१ बॉक्सचा साठा जप्त केला. या मद्याची किंमत सुमारे २०.७७लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

याशिवाय, मद्य वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला अशोक लेलैंड कंपनीचा ट्रक किंमत अंदाजे २० लाख रुपये, तसेच दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ४१.७५ लाखांहून अधिक आहे. या प्रकरणी पारस अमंदाराम जाट (वय २६, रा. बाडमेर, राजस्थान) व अजय धनराज पाटील (वय ३०, रा. पिंपळणेर, जि. धुळे) या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा भरारी पथकाने केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक अजयकुमार पाटील करत आहेत.

Advertisement
Tags :

.