महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘ईएसआय’ विमाधारकांना उपचारापेक्षा हेलपाटेच जादा ! कागदपत्रासाठी ईएसआयकडून रूग्णांना ताकतुंबा

05:56 PM Sep 25, 2024 IST | Abhijeet Khandekar
State Employment Insurance Scheme (ESI)
Advertisement

40 कोटींचा निधी असूनही सुविधा अपुऱ्याच : इमारतीच्या नुतनीकरणाचे काम रखडले, काही औषधांचाही तुडवडा : 24 तास सेवेच गरज

Advertisement

इम्रान गवंडी कोल्हापूर

राज्य कामगार विमा योजनेच्या (ईएसआय) हॉस्पिटलमध्ये उपचारापेक्षा कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी रूग्ण व नातेवाईकांना भटकंती करावी लागत आहे. ईएसआय म्हणजे उपचारापेक्षा हेलपाटेच जादा असा अनुभव रूग्णांना येत असल्यामुळे ही भटकंती थांबणार कधी..? असा प्रश्न विमाधारक कर्मचारी करत आहेत. 40 कोटींचा निधी असूनही अपुऱ्या सुविधांमुळे रूग्णांना उपचारासाठी सतत इकडून तिकडे धावपळ करावी लागत आहे.

Advertisement

शासकीय विश्रामगृहाच्या पिछाडीस असणाऱ्या ईएसआय हॉस्पिटलच्या इमारतीच्या नुतनीकरणामुळे 100 बेडसह 10 आयसीयु, तीन आधुनिक ऑपरेशन थिएटर, रेडीएशन, सर्व प्रकारच्या तपासण्या व शस्त्रक्रियांसह सर्वच उपचार एकाच छताखाली मिळणार असल्याची चर्चा आहे. पण सध्या वेगळीच स्थिती आहे. एक्सरे तपासणीची सुविधा असली तरी आधुनिक मशिनरी नसल्याने 250 रूपयांच्या एक्सरे तपासणीला विमाधारकांना कागदपत्रांच्या पुर्ततेसाठी माराव्या लागणाऱ्या हेलपाट्यांमध्ये दुपटीने पैसे खर्च होत आहेत. ओपीडीसाठी रांगेत उभे राहूनही नंबर येताच हॉस्पिटलच्या वेळेनुसार सर्वच विभाग बंद होतात. त्यामुळे पुन्हा रूग्ण व नातेवाईकांना प्रतिक्षा करत ताटकळत बसावे लागत आहे.

ईएसआयच्या मुख्य इमारतीचे काम कासवगतीने सुरू आहे. हॉस्पिटल अद्ययावत करण्यासाठी 40 कोटींचा निधी असूनही काम रखडले आहे. येथील अपुऱ्या सुविधांमुळे रूग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. ईएसआय हॉस्पिटलच्या इमारतीचे काम सुरू होऊन 5 वर्ष झाली तरी काम अर्धवटच आहे.

उपचारापेक्षा हेलपाटेच जादा : कागदपत्रांसाठी विमाधारकांना मानसिक त्रास
ईएसआयचे उपचार घ्यायचे असतील तर प्रारंभी नेमून दिलेल्या उपरूग्णालयात तपासणी करावी लागते. तेथून डॉक्टरांची चिठ्ठी घेऊन सर्कीट हाऊस येथील मुख्य हॉस्पिटलमधील तज्ञांकडून तपासणी केली जाते. रूग्णाच्या आजाराबाबत तपासणी किंवा उपचाराची सुविधा उपलब्ध नसेल तर पुन्हा रेफरलसाठी उप रूग्णालयात जावे लागते. तेथून कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी दिवस घालवावा लागतो. रेफरल पूर्ण होताच उपचारासाठी दिलेल्या खासगी रूग्णालयात गेल्यानंतर एखादा कागद कमी असेल तर उपचारासाठी पुन्हा हेलपाटे मारावे लागतात.

तर हेलपाटे कमी होतील
हेलपाटे कमी करण्यासाठी राज्य कामगार विमा योजनेच्या किचकट प्रक्रियेमध्ये बदल होणे आवश्यक आहे. नेमून दिलेल्या उप दवाखान्यातील डॉक्टरांनी रूग्णाची स्थिती पाहून तिथेच आवश्यक तपासणीसाठी रेफरल लेटर दिले तर रूग्ण व नातेवाईकांचे हेलपाटे कमी होण्यास मदत होईल.

एमआरआय मशिनसाठी उदासिनता
एखाद्या आजाराच्या अचुक निदानासाठी एमआरआय तपासणी महत्वाची आहे. पण एमआरआय मशिन खरेदीसाठी प्रशासन उदासिनता दाखवत आहे. एखाद्याने खासगी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एमआरआय तपासणीची मागणी केली तरी ईएसआय हॉस्पिटलमधील डॉक्टरांकडून रेफरल देण्यास नकार दिला जात आहे.

विमाधारकांची आकडेवारी :
-एकूण विमाधारक : 1 लाख 25 हजार
-उपचारासाठी येणारे रूग्ण : 6 लाख 30 हजार
-रोज तपासणीसाठी येणारें रूग्ण : 300 ते 375
-एकूण बेडची संख्या : 30

उपाययोजना करू
इमारतीच्या नुतनीकरणाचे काम सुरू असून यामध्ये 100 बेडसह आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित होणार आहे. विमाधारकांना सर्वच सुविधा एकाच छताखाली मिळणार आहेत. नुतनीकरणाला गती मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
डॉ. रविंद्र पवार, वैद्यकीय अधिक्षक, ईएसआय हॉस्पिटल

Advertisement
Tags :
Completion of documents rather thanState Employment Insurance Scheme (ESI)
Next Article