For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प

10:39 AM Feb 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प
Advertisement

बेंगळूर : 2026-27 आर्थिक वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. 6 मार्च ते 27 मार्च या कालावधीत अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या 6 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री एच. के. पाटील यांनी दिली. अर्थसंकल्पीय अधिवेशन 6 मार्च ते 27 मार्च या कालावधीत होणार असून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 6 मार्च रोजी मुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री सिद्धरामय्या आपला 17 वा अर्थसंकल्प सादर करतील. त्यामुळे, सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांची पुन्हा एकदा ओळख निर्माण होईल. यंदा अर्थसंकल्पीय अधिवेशन एकूण 14 दिवस चालणार असून मुख्यमंत्री 6 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर करतील.

Advertisement

Advertisement
Tags :

.