स्टेट बँकेचा समभाग चमकला
06:30 AM Feb 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई :
Advertisement
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया यांचा समभाग सोमवारी दमदार तेजीसमवेत कार्यरत होता. तिसऱ्या तिमाहीतील मजबूत निकालांमुळे समभाग दौडताना दिसला. सकाळी इंट्रडे दरम्यान समभाग 6 टक्के वाढत 1130 रुपयांवर व्यवहार करत होता. 1136 रुपयांवर पोहोचत बँकेच्या समभागाने 52 आठवड्यानंतर सर्वोच्च स्थानी पोहोचण्याचा विक्रमही केला. नुवामा यांनी एसबीआयचा समभाग 1250 रुपयांवर पोहोचू शकतो, असा अंदाज वर्तविला आहे. तर दुसरीकडे मोतिलाल ओसवाल यांनीसुद्धा समभागा 1300 रुपयांवर पोहचू शकतो, अंदाज वर्तविला आहे.
Advertisement
Advertisement