For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

स्टेट बँकेचा नफा 14 टक्क्यांनी मजबूत

06:36 AM Nov 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
स्टेट बँकेचा नफा 14 टक्क्यांनी मजबूत
Advertisement

वाढीसह नफा 23,038 कोटींवर : दुसऱ्या तिमाहीत व्याज उत्पन्नात 15 टक्क्यांची वाढ

Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) जुलै ते सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. बँकेने या तिमाहीत एकूण 23,038 कोटींचा नफा नोंदवला आहे, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा सुमारे 14 टक्के जास्त आहे. त्या तिमाहीत बँकेला 20,160 कोटींचा नफा झाला होता.

Advertisement

बँकेचे मुख्य उत्पन्न लोकांना दिलेल्या कर्जावर मिळणाऱ्या व्याजातून येते. याला एनआयआय म्हणजेच निव्वळ व्याज उत्पन्न म्हणतात. या तिमाहीत बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न वाढून 49,142 कोटींवर पोहोचले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात सुमारे 15 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या वर्षी हे उत्पन्न सुमारे 42,847 कोटी रुपयांचे होते.

कर्ज वितरण आणि ठेवींमध्ये वाढ

30 सप्टेंबर 2026 पर्यंत बँकेने दिलेले एकूण कर्ज वार्षिक 7.84 टक्क्यांनी वाढून 52 लाख कोटी रुपये झाले आहे. बँकेच्या भाषेत याला ‘ग्रॉस अॅडव्हान्सेस’  म्हणतात. त्याच वेळी, बँकेत जमा झालेली एकूण रक्कम देखील 12.27 टक्क्यांनी वाढून 63 लाख कोटी रुपये झाली आहे.

निकालानंतर शेअर 1 टक्क्यांनी तेजीत

निकालानंतर, एसबीआयचे शेअर्स मंगळवारी 1 टक्क्यांच्या वाढीसह 995 रुपयांवर व्यवहार करत आहेत. एका महिन्यात 4 टक्के आणि एका वर्षात 5 टक्के समभागाच्या भावात वाढ झाली आहे. गेल्या 6 महिन्यांत बँकेच्या शेअरमध्ये 7 टक्क्यांची घसरण झाली आहे. एसबीआयचे बाजार भांडवल 9.15 लाख कोटी रुपये आहे.

Advertisement
Tags :

.