For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोल्हापूरात शुक्रवारपासून राज्य व राष्ट्रीय जलतरण स्पर्धा

05:57 PM Jan 21, 2025 IST | Radhika Patil
कोल्हापूरात शुक्रवारपासून राज्य व राष्ट्रीय जलतरण स्पर्धा
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

स्विमिंग हब फाउंडेशनच्या वतीने 24 ते 26 जानेवारी कालावधीत तिसऱ्या राज्य व राष्ट्रीय जलतरण स्पर्धेचे आयोजन केले आहे. देशाचे उपपंतप्रधान व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित केली जाणारी ही स्पर्धा राष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील जलतरण तलावामध्ये होईल. राज्यस्तरीय स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून व राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, गुजरात, मख्यप्रदेश, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, त्रिपुरा या राज्यांमधील 310 जलतरणपटू सहभागी होणार आहेत.

24 रोजी सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते राज्य व राष्ट्रीय जलतरण स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येईल. 25 जानेवारीपासून स्पर्धेसाठी नियोजित केलेल्या 8, 10, 12, 14, 17, 19 वर्षाखालील मुले-मुली अशा सहा वयोगटात राज्य व राष्ट्रीय स्पर्धा होईल. तसेच या दोन्हीही स्पर्धा 50, 100, 200, 400 मीटर आंतरनुसार फ्रिस्टाईल, बटरफ्लाय, ब्रेस्टस्ट्रोक, बॅकस्ट्रोक व आयएम या पाच प्रकारांमध्ये होतील. 26 जानेवारीला स्पर्धेची सांगता होईल.

Advertisement

बक्षीस वितरण समारंभात राज्य व राष्ट्रीय स्पर्धेतील प्रत्येक वयोगटात पहिल्या तीन क्रमांकात स्थान मिळवणाऱ्या जलतरणपटूंना सुवर्ण, रौप्य, कांस्य पदक व प्रमाणपत्र बक्षीस देऊन सन्मानित केले जाईल. तसेच राष्ट्रीय स्पर्धेतील प्रत्येक वयोगटात सर्वाधिक पदके पटकावणाऱ्या मुला-मुलींना प्रत्येकी 7 हजार ऊपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवले जाईल. तसेच सर्वाधिक पदके मिळवणाऱ्या क्लब व प्रशिक्षकांनाही प्रत्येकी 5 हजार ऊपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत प्रत्येक वयोगटात सर्वाधिक पदके मिळवणाऱ्या मुला-मुलींना प्रत्येकी 5 हजार ऊपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

Advertisement
Tags :

.