स्टार्टअप महाकुंभला नवी दिल्लीत सुरुवात
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारतातील स्टार्टअप इकोसिस्टीमचा सर्वात मोठा स्टार्टअप महाकुंभ गुरुवार 3 एप्रिलपासून नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये सुरु झाला आहे. 5 तारखेपर्यंत चालणाऱ्या महाकुंभात जवळपास 3 हजार स्टार्टअप्स, 1 हजारहून अधिक गुंतवणूकदार आणि 50 हून अधिक देशांचे प्रतिनिधी सामील झाले आहेत. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्य मंत्री जितीन प्रसाद यांच्या हस्ते स्टार्टअप महाकुंभाचे उदघाटन करण्यात आले.
स्टार्टअप महाकुंभाचे आयोजन भारत सरकारच्या डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्रि अँड इंटर्नल ट्रेड आणि स्टार्टअप इंडिया यांच्याअंतर्गत करण्यात आले आहे. ही कार्यक्रमाची दुसरी आवृत्ती आहे. जिथे 3000 हून अधिक स्टार्टअप्स आपल्या नवे तंत्रज्ञान, उत्पादने आणि सेवांचे प्रदर्शन करणार आहे. स्टार्टअप्सना निधी मिळवून देणे, त्यांच्या विस्तारासाठी संधी उपलब्ध करणे व जागतिक गुंतवणूकदारांशी भेट करवून देण्यासाठी महाकुंभाचे आयोजन केले आहे.
या दिग्गजांची उपस्थिती
यात लेन्सकार्टचे संस्थापक पियुष बन्सल, ड्रीम 11 चे संस्थापक हर्ष जैन, बुक माय शोचे संस्थापक आशिष हेमराजानी यांच्यासह फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बन्सल, पेटीएमचे संस्थापक विजयशेखर शर्मा, बोटचे संस्थापक अमन गुप्ता, इज माय ट्रीपचे संस्थापक रिकांत पिट्टी, ब्लिंकीटचे सहसंस्थापक अलबिंदर ढींडसा यासारख्या दिग्गजांचा सहभाग आहे.