For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवजयंती मिरवणूक वेळेत सुरू करा

11:00 AM May 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
शिवजयंती मिरवणूक वेळेत सुरू करा
Advertisement

पोलीस अधिकाऱ्यांची सूचना

Advertisement

बेळगाव : शिवबसव जयंतीची मिरवणूक वेळेत सुरू करण्याची सूचना पोलीस अधिकाऱ्यांनी केली. बुधवारी सायंकाळी येथील मार्केट पोलीस स्थानकात शिवजयंती उत्सव मंडळ, चित्ररथ मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. मार्केटचे एसीपी सोमेगौडा जी. यु., पोलीस निरीक्षक प्रदीप तळकेरी आदींनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या बैठकीत माजी महापौर मालोजी अष्टेकर, नेताजी जाधव, प्रकाश मरगाळे, सुनील जाधव, मदन बामणे आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. 11 मे रोजी शिवजयंती चित्ररथ मिरवणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने तयारी सुरू केली आहे. मार्केट पोलीस स्थानकात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना करण्यात आल्या. वेळेत मिरवणूक सुरू करावी, शेवटपर्यंत पदाधिकाऱ्यांचा मिरवणुकीत सहभाग असावा, अप्रिय घटनांना थारा देऊ नये, अशा सूचना करण्यात आल्या. गुरुवारी पोलीस आयुक्त कार्यालयात शिवबसव जयंतीच्या पार्श्वभूमीवर बैठक होणार असून या बैठकीत पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बनँग मार्गदर्शन करणार आहेत. निवडणूक आचारसंहितेमुळे मिरवणूक वेळेत होणार की नाही? याविषयी कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम होता. आता हा संभ्रम दूर झाला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.