For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शालेय प्रवेशासाठीच्या प्रक्रियेला प्रारंभ

12:45 PM Apr 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
शालेय प्रवेशासाठीच्या प्रक्रियेला प्रारंभ
Advertisement

बेळगाव : मागील शैक्षणिक वर्ष संपून नुकताच निकाल देण्यात आला. यामुळे पुढील वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी तसेच नवीन शाळेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांची गर्दी होत आहे. शाळांचे प्रवेश अर्ज घेण्यासोबतच काही शाळांनी विद्यार्थी व पालकांची मुलाखत आयोजित केली आहे. यामुळे पालकांना त्या मुलाखतीची तयारी करावी लागत आहे. शालेय शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षांचे निकाल बुधवार दि. 9 रोजी जाहीर झाले. काही विद्यार्थी शाळा बदलणार असल्याने नवीन प्रवेशासाठी शाळांमध्ये धावपळ सुरू आहे. एलकेजी-युकेजी वर्गांच्या प्रवेशासाठी चार महिन्यांपूर्वीच अर्ज स्वीकृती करण्यात आली. परंतु, आता पहिली ते नववीचे प्रवेश करून घेतले जात आहेत. प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थी व पालक शाळांवर दाखल होत आहेत. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असल्याने अर्ज स्वीकारून ते भरून देण्यासाठी पालकांची तारेवरची कसरत सुरू आहे. इंग्रजीसोबतच मराठी व कन्नड शाळांमध्येही प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.