For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नामांकन प्रक्रियेला प्रारंभ

06:28 AM Mar 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
नामांकन प्रक्रियेला प्रारंभ
Advertisement

पहिल्या टप्प्यात 21 राज्ये-केंद्रशासित प्रदेशात 102 जागांसाठी मतदान : लोकसभा निवडणूक अधिसूचना जारी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

लोकसभा निवडणूक 2024 च्या पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक आयोगाकडून बुधवारी अधिसूचना जारी करण्यात आली. अधिसूचना जारी होताच देशभरातील 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 102 मतदारसंघांमध्ये नामांकन प्रक्रिया सुरू झाली आहे. उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि राजस्थान यासारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये या टप्प्यात निवडणूक होत आहे. तसेच महाराष्ट्रात नागपूरसह पाच मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होणार असून राज्यात पहिल्याच दिवशी एका अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे.

Advertisement

देशात गेल्या आठवड्यात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे. त्यानंतर आता पहिल्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्वसाधारण उमेदवारांना 25,000 ऊपये आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना 12,500 ऊपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 27 मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. 28 मार्च रोजी अर्जांची छाननी होणार असून 30 मार्च रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. एप्रिल महिन्यात मतदान होणार असले तरी 4 जून रोजी मतमोजणी होईल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. तामिळनाडूतील सर्व 39 मतदारसंघांमध्ये पहिल्याच टप्प्यात मतदान पूर्ण होणार आहे.

 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान

पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला होणार असून, त्यात 21 राज्यांतील 102 जागांवर मतदान होणार आहे. तर 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यांतील 89 जागांवर मतदान होणार आहे. त्याचप्रमाणे तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी 12 राज्यांतील 94 जागांवर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 13 मे रोजी चौथ्या टप्प्यात 10 राज्यांतील 96 जागांवर, 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात 8 राज्यांतील 49 जागांवर, 25 मे रोजी सहाव्या टप्प्यात 7 राज्यांतील 57 जागांवर मतदान होणार आहे. 1 जून रोजी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात 8 राज्यांमध्ये 57 जागांसाठी मतदान होणार आहे.

उत्तर प्रदेशातील 8 मतदारसंघ

उत्तर प्रदेशमधील 18 व्या लोकसभेच्या निवडणुकीची सुऊवात बुधवारी राज्यातील सात टप्प्यातील मतदानाच्या पहिल्या टप्प्यातील नामांकनांसह झाली आहे, असे निवडणूक आयोगाने सांगितले. उत्तर प्रदेशमधील सहारनपूर, कैराना, मुझफ्फरनगर, बिजनौर, नगीना (अनुसूचित जाती), मुरादाबाद, रामपूर आणि पिलीभीत या आठ लोकसभा मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यावेळी, बहुजन समाज पक्षाने (बीएसपी) स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे, तर समाजवादी पक्षाने (एसपी) काँग्रेससोबत युती केली असून ते ‘इंडिया’ विरोधी गटाचा भाग आहेत.

राजस्थानमध्ये 12 मतदारसंघांमध्ये मतदान

राजस्थानमध्ये 19 एप्रिल रोजी गंगानगर, बिकानेर, चुरू, झुंझुनू, सीकर, जयपूर ग्रामीण, जयपूर, अलवर, भरतपूर, करौली-धौलपूर, दौसा आणि नागौर या 12 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी प्रवीण गुप्ता यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात पाच मतदारसंघासाठी अधिसूचना जारी

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना आजपासून (बुधवार) लागू करण्यात आली आहे. नागपूरसह पूर्व विदर्भातील रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया या पाच लोकसभा मतदारसंघासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार असून या मतदारसंघांसाठी ही अधिसूचना लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आल्याचे बघायला मिळत आहे. नागपूर शहरालगतच्या सर्व सीमेवर पोलिसांनी नाकाबंदी करत चोख पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. सोबतच निवडणूक आयोगाचे भरारी पथक देखील वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.