For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आगामी ता.पं., जि.पं.निवडणुकीच्या तयारीला लागा

10:56 AM Jan 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
आगामी ता पं   जि पं निवडणुकीच्या तयारीला लागा
Advertisement

भाजप प्रदेशाध्यक्षांची बेळगावच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

Advertisement

बेळगाव : जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून बेंगळूर येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव ग्रामीण, बेळगाव महानगर, चिकोडी विभागाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. आगामी दोन्ही निवडणुकींच्या तयारीला लागा, अशा सूचना प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. राज्य भाजप कार्यालय येथील जगन्नाथ भवन येथे ही बैठक झाली. बैठकीला माजी मुख्यमंत्री सदानंदगौडा, राज्य सहप्रभारी सुधाकर रेड्डी, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते चलवादी नारायणस्वामी, राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी,  डॉ. प्रभाकर कोरे, प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनके, भालचंद्र जारकीहोळी, महांतेश कवटगीमठ, माजी आमदार संजय पाटील, माजी आमदार अरविंद पाटील यांच्यासह इतर उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.