For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहरातील धोकादायक वृक्ष हटविण्यास प्रारंभ

11:02 AM Jul 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
शहरातील धोकादायक वृक्ष हटविण्यास प्रारंभ
Advertisement

वनखात्याला उशिराने जाग : जुनाट-कमकुवत झाडांवर कार्यवाही

Advertisement

बेळगाव : वादळी पावसामुळे धोकादायक वृक्षांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर वनखात्याने धोकादायक झाडे हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. सोमवारी कॉलेज रोडजवळील जुनाट धोकादायक वृक्ष हटविण्यात आले. शहरात कमकुवत आणि आयुर्मान संपलेल्या वृक्षांची संख्या अधिक आहे. असे वृक्ष हटविण्याची कार्यवाई सुरू आहे. मात्र, वनखात्याला याबाबत उशिरा जाग आल्याचे दिसत आहे. पावसाळ्यापूर्वीच धोकादायक वृक्ष हटविण्याची गरज होती. मात्र, वनखात्याकडून उशिराने ही मोहीम सुरू झाली आहे.

मागील महिन्यात बेळगुंदीतील रस्त्यावर वृक्ष कोसळून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे धोकादायक वृक्षांचा प्रश्न समोर आला आहे. दरम्यान, धोकादायक झाडांचा सर्व्हे करून ती तातडीने हटवावीत, अशी मागणी करण्यात आली होती. त्याची दखल वनखात्याने उशिराने घेतली आहे. शहरातील धोकादायक झाडे हटविण्याचे काम सुरू आहे. कॉलेज रोड येथील जुनाट कमकुवत झालेले दोन वृक्ष सोमवारी वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी हटविले. त्यामुळे तेथील परिसराने मोकळा श्वास घेतला.

Advertisement

मात्र, अद्यापही इतर ठिकाणी असलेल्या धोकादायक झाडांवर कार्यवाही व्हावी, अशी मागणी होत आहे. शहरात 134 हून अधिक वृक्ष धोकादायक असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे येत्या काळात वनखाते या झाडांवर कार्यवाही करणार का? हे पाहावे लागणार आहे. वादळी पावसामुळे धोकादायक वृक्षांचा प्रश्न समोर आला आहे. ठिकठिकाणी झाडांची पडझड होऊ लागली आहे. यात खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत आहे. त्यामुळे अशी झाडे तातडीने हटवावीत, अशी मागणी कायम सुरू होती. याची दखल घेत वनखात्याने जीर्ण झाडे हटविण्याची मोहीम सुरू केली आहे.

स्मार्टसिटीच्या कामामुळे झाडांची मुळे कमकुवत

शहरात सुरू असलेल्या स्मार्टसिटीच्या कामामुळे विविध ठिकाणी खोदाई करण्यात आली आहे. रस्ते, गटारी, जलवाहिन्या, ड्रेनेज वाहिन्या व इतर विकास कामांमुळे झाडांची मुळे तुटली आहेत. त्यामुळे अशी झाडे कमकुवत बनली आहेत. सध्या सुरू झालेल्या पावसामुळे अशी झाडे धोकादायक बनली आहेत. अशा झाडांवर प्रथमत: कार्यवाही होणे आवश्यक आहे.

Advertisement
Tags :

.