For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ग्रासरूट फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ

10:32 AM Aug 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
ग्रासरूट फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ
Advertisement

400 हून अधिक फुटबॉलपटूंना संधी

Advertisement

बेळगाव : जय भारत फौंडेशन आयोजित ग्रासरूट साखळी फुटबॉल स्पर्धेला विविध गटांतील स्पर्धांना मोठ्या उत्साहात सेंट पॉल्स स्कूलच्या टर्फ मैदानावर प्रारंभ झाला. सदर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जय भारत फौंडेशनचे सभासद सेंट पॉल्सचे मुख्याध्यापक फादर सायमन फर्नांडीस, रोटरी क्लब वेणुग्रामचे अध्यक्ष विनय बाळेकाई, बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव अमित पाटील, अल्पेश जैन, समीर कणबर्गी आदी उपस्थित होते. ग्रासरूट फुटबॉल लीग स्पर्धेच्या चषकांचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. बेळगाव व दक्षिण कर्नाटकात मॅजिक स्पोर्टस् क्लबच्या बॅनरखाली होतकरु फुटबॉलपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रासरूट फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. हरिश बंग, गिरीमग बंग यांच्या पुढाकाराने सहा वर्षांखालील, आठ, दहा, बारा, चौदा आणि सोळा वर्षांखालील मुलांसाठी तर 15 वर्षांखालील मुलींसाठी या स्पर्धा भरविल्या जात आहेत. बेळगावात जवळपास विविध गटातील 70 संघांनी भाग घेतला. 400 हून अधिक फुटबॉलपटूंना या स्पर्धेव्दारे फुटबॉल खेळण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. जवळपास 14 सामने प्रत्येक संघाला खेळण्यास मिळणार असल्याने फुटबॉलपटूंची प्रगती नक्कीच होणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.