घरकुल-2024 प्रदर्शनाची मुहूर्तमेढ उत्साहात
21-26 नोव्हेंबरदरम्यान सीपीएड मैदानावर आयोजन : घरबांधणीसाठीचे साहित्य एकाच छताखाली
बेळगाव : ‘तरुण भारत’ पुरस्कृत घरकुल-2024 हे प्रदर्शन 21 ते 26 नोव्हेंबरदरम्यान बेळगावच्या सीपीएड मैदानावर होणार आहे. प्रदर्शनाची मुहूर्तमेढ रविवारी मोठ्या उत्साहात रोवण्यात आली. रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष विनय बाळीकाई व चारुशिला बाळीकाई यांच्या हस्ते मुहूर्तमेढ कार्यक्रम झाला. रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगाव व कन्सल्टींग सिव्हिल इंजिनियर्स असोसिएशन बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदर्शन होणार आहे. या प्रदर्शनाला प्रियाशक्ती स्टील हे डायमंड प्रायोजक लाभले आहेत. घरबांधणीसाठी लागणारे सर्व साहित्य एकाच छताखाली पाहण्याची संधी घरकुल प्रदर्शनाने दिली आहे. अकरावे घरकुल प्रदर्शन काही दिवसातच सीपीएड मैदानावर होणार आहे. बांधकाम व्यवसाय तसेच गृहबांधणीची संपूर्ण माहिती, नवीन टेक्नॉलॉजी प्रदर्शनात पाहता येणार आहे. या प्रदर्शनामध्ये 170 हून अधिक स्टॉल मांडण्यात आले आहेत. यामध्ये रियल इस्टेट क्षेत्रासंबंधी सर्वाधिक स्टॉल असणार आहेत. याचबरोबर खाद्यपदार्थ व गृहोपयोगी साहित्याचे स्टॉलदेखील मांडणार येणार आहेत.
रविवारी सकाळी सीपीएड मैदानावर प्रदर्शनाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. उदय उपाध्ये यांनी पौरोहित्य केले. यावेळी कन्सल्टींग सिव्हिल इंजिनियर्स असोसिएशनचे अध्यक्ष रमेश जी. टी., सेक्रेटरी वीरेश शेट्टण्णावर, महेश अरबोळे, संदीप तुबची, महेश हेब्बाळे, नागराज बन्नूर, उमेश सरनोबत, राजकुमार होंगल, अर्पित तुबची, राजू हम्मण्णावर, गजानन घाडगे, श्रीनिवास देशपांडे, वैजनाथ चौगुले, चंद्रकांत मणगुत्ती, उल्हास यक्कुंडी, दयानंद तोरगल, संजय तरळे, महेश मोरे, बाळकृष्ण जाधव, अर्जुन लाड, मल्लिकार्जुन मुदनूर, गजेंद्रकुमार शेडबाळ तसेच रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे महेश अनगोळकर, राजेश तळेगाव, उमेश रामगुरवाडी, संजीव देशपांडे, जिग्नेश गोराडिया, डी. बी. पाटील, चंद्रकांत राजमाने, सोमनाथ कुडचीकर, प्रसाद कट्टी, आनंद चौगुले, वीरेश उळवी, ‘तरुण भारत’चे संदीप जोग, अरुण दैवज्ञ, सुहास देशपांडे यासह इतर उपस्थित होते.
मोजकेच स्टॉल उपलब्ध
स्टॉलधारकांनी स्टॉल बुकिंगला उत्तम प्रतिसाद दिला आहे. सध्या मोजकेच स्टॉल उपलब्ध आहेत. इच्छुक स्टॉलधारकांनी लवकरात लवकर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्टॉल बुकिंगसाठी 9449056936, 9448116468, 9341873944 या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.