For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

छ. शिवाजी क्लस्टर प्राथमिक क्रीडा स्पर्धांना प्रारंभ

10:21 AM Aug 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
छ  शिवाजी क्लस्टर प्राथमिक क्रीडा स्पर्धांना प्रारंभ
Advertisement

बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते व एसकेई कन्नडा स्कुल आयोजित छत्रपती शिवाजी महाराज क्लस्टर टिळकवाडी, शहापूर, अनगोळ विभागीय प्राथमिक क्रीडा स्पर्धेच्या अॅथलेटीक स्पर्धांना मोठ्या उत्साहात उद्घाटन झाले. आरपीडी महाविद्यालयाच्या मैदानावर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन राष्ट्रीय खेळाडू चैतन कारेकर, एसकेई संस्थेचे सभासद श्रीकृष्ण आजगावकर, संस्थेचे क्रीडा संयोजक आनंद सराफ, नगरसेवक अभिजित जवळकर, पीईओ जे. बी. पटेल, वंदना बर्गे, संतोष खिमजी, श्ऱीनिवास सोनटक्की, मुख्याध्यापीका एस. डी. नायक, टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विवेक पाटील व स्पर्धा सचिव प्रविण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी चैतन्य कारेकरच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी बालिका आदर्शच्या विद्यार्थिनींनी आपल्या बॅन्डच्या तालावर पथसंचलन करुन मानवंदना दिली. पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सुभाषचंद्र बोस प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

Advertisement

एसकेई कन्नडा हायस्कूलचे राज्यस्तरीय खेळाडू प्रेम पाटील व संदीप हेगडे यांनी क्रीडाज्योत मैदानावरती फिरवून पाहुण्यांकडे सुपूर्द केली. दिया खडकीने सर्व खेळाडूंना शपथ देवविली. यावेळी प्रमुख पाहुणे चैतन्य कारेकरने विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच नियमीतपणे सराव केल्यास व संयम राखल्यास यश मिळू शकते. त्यासाठी प्रयत्न करणे हे गरजेचे आहे. आपणला यश लवकर मिळणार याची शाश्वती नसते. पण आपण संयम ठेवून नियमीत सराव केल्यास यशाची पायरी गाठू शकतो. त्यासाठी खडतर परिश्रम घेणे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी आनंद सराफ, श्रीकृष्ण आजगावकर, अभिजित जवळकर, जे. बी. पटेल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या. प्राथमिक विभागात 100 मी., 200, 400, 600 मी., गोळा फेक, थाळीफेक, लांबउडी, उंचउडी,4×100 मी. रिले, 80 मी. अडथळा शर्यत आदी खेळांना प्रारंभ करण्यात आला. यावेळी क्रीडा शिक्षक सी. आर. पाटील, जयसिंग धनाजी, अर्जुन भेकणे, संतोष दळवी, उमेश मजुकर, उमेश बेळगुंदकर, सिल्वीया डिलीमा, परीट, मॅथ्यु लोबो आदी शिक्षक उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.