For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

यरगट्टीला शासकीय कार्यालये सुरू करा

10:29 AM Dec 06, 2023 IST | Tarun Bharat Portal
यरगट्टीला शासकीय कार्यालये सुरू करा
Advertisement

कर्नाटक राज्य रयत संघ, हसिरू सेनेसह इतर संघटनांची मागणी

Advertisement

बेळगाव : यरगट्टी तालुक्याची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र तालुका शासकीय कार्यालयांपासून वंचित राहिला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होवू लागले आहेत. त्यामुळे यरगट्टी तालुक्यात शासकीय कार्यालये सुरू करावीत, अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसिरू सेना यांच्यासह विविध संघटनांनी सोमवारी विधानसौध परिसरात आंदोलनाद्वारे केली आहे. यरगट्टी तालुक्यात पोलीस स्थानक, तालुका पंचायत, आरोग्य केंद्र, सार्वजनिक हॉस्पिटल, केईबी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम खाते यासह इतर शासकीय कार्यालये नाहीत. त्यामुळे नागरिकांना इतर तालुक्यांवर अवलंबून रहावे लागत आहे. शासकीय कागदपत्रांसाठी सौंदत्ती आणि इतर ठिकाणी धावपळ करावी लागत आहे. त्याबरोबर 24 तास पाणीपुरवठा, कृषी यंत्र सामुग्री, अग्निशमक युनिट, पेय जल आणि इतर सुविधांचादेखील अभाव आहे. तालुकास्तरीय मैदान नसल्याने विद्यार्थ्यांचीही गैरसोय होवू लागली आहे. तातडीने यरगट्टीला शासकीय सुविधांबरोबर इतर सोयी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे. कळसा-भांडुरा प्रकल्प, लक्ष्मी देवी, बळ्ळारी नाला सिंचन योजना आणि इतर प्रकल्पांचे काम रखडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसू लागला आहे. तातडीने प्रकल्प मार्गी लावून सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.