महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बांदा -आंबोली एसटी बस सुरू करा

05:16 PM Dec 03, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

बांदा प्रभारी सरपंच जावेद खतीब यांची मागणी

Advertisement

मयुर चराटकर
बांदा

Advertisement

बांदा येथून वाफोली, बावळाट, दाणोली मार्गे आंबोली नियमित बस सेवा सुरू करावी अशी लेखी मागणी बांदा प्रभारी सरपंच जावेद खतीब यांनी सावंतवाडी आगार व्यवस्थापक यांना केली आहे. लवकरात लवकर याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन एसटी प्रशासनाने दिल्याची माहिती श्री खतीब यांनी दिली.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बांदा (व्हाया) वाफोली, बावळाट, दाणोली मार्गे आंबोली नियमित बस सेवा सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे. सदरची बस सेवा नसल्याने रोजगारासाठी जे लोक गोवा येथे कामाला जातात त्यांना सावंतवाडी मार्गे बांद्यात यावे लागते. तसेच शाळकरी मुलेदेखील बांद्यात येतात. त्यांना बस सेवा नसल्याने पायपीठ करावी लागते. त्याचप्रमाणे वैद्यकीय सेवेसाठी देखील बांदा गावातूनच गोवा राज्यात जावे लागते अशावेळी त्यांची गैरसोय होते.बांदा ही बाजारपेठ देखील मोठी असल्याने मोठ्या प्रमाणावर लोकांची ये जा असते. या सर्व बाबींचा विचार करता सदरची बस सेवा तात्काळ सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे तात्काळ कार्यवाही करून सुरुवातीला किमान एक फेरी सुरू करावी अशी मागणी खतीब यांनी केली आहे.

 

Advertisement
Tags :
# banda # amboli # bus
Next Article