‘स्टारलिंक जेन 2“चे भारतात पुनरागमन
डायरेक्ट-टू-फोन कनेक्टिव्हिटीसह 30,000 उपग्रहांसाठी मंजुरी : नवीन वैशिष्ट्यांचाही समावेश
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) भारतीय आयुर्विमा महामंडळाला (एलआयसी) एचडीएफसी बँकेतील आपली हिस्सेदारी 9.99 टक्क्यांपर्यंत वाढवण्यास मंजुरी दिली आहे. एचडीएफसी बँकेने शेअर बाजाराला ही माहिती दिली आहे.
बँकेनुसार, आरबीआयने 19 ऑगस्ट 2026 रोजीच्या पत्रानुसार एलआयसीला एचडीएफसी बँकेच्या पेड-अप शेअर कॅपिटलमधील आपली एकूण हिस्सेदरी मतदानाच्या अधिकारांमध्ये 9.99 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची परवानगी दिली आहे. याचा परिणाम गुरुवारी एचडीएफसी बँकेच्या शेअर्सवर दिसून आला. सुरुवातीच्या व्यवहारात शेअर्समध्ये 1 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. एलआयसीकडे सध्या 4.11 टक्के हिस्सेदारी आहे.
एचडीएफसी बँकेने म्हटले आहे की, 14 ऑगस्ट 2026 रोजी उपलब्ध असलेल्या नवीनतम लाभधारक हिस्सेदारीनुसार, बँकेच्या एकूण भाग भांडवलामध्ये एलआयसीची 4.11 टक्के हिस्सेदारी होती. याचा अर्थ असा की, आरबीआयच्या मंजुरीनंतर, एलआयसीला एचडीएफसी बँकेमधील आपली हिस्सेदारी सध्याच्या पातळीवरून कमाल 9.99 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
एलआयसीने आरबीआयकडे मंजुरी मागितली होती
बँकेच्या म्हणण्यानुसार, एलआयसीने आपला हिस्सा वाढवण्यासाठी आरबीआयकडे अर्ज केला होता. या अर्जाच्या आधारे, आरबीआयने मंजुरी दिली आहे. तथापि, यासाठी इतर नियामक अटींची पूर्तता करणे अनिवार्य असेल.
एलआयसीला बँकिंग नियमन कायदा, 1949, बँकांमधील मतदानाच्या अधिकारांचे संपादन आणि धारण करण्यासंबंधी आरबीआयच्या सूचना, परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा), 1999 आणि भारतीय प्रतिभूति आणि विनिमय मंडळ (सेबी) यांच्या संबंधित नियमांचे पालन करावे लागेल.
याव्यतिरिक्त, एलआयसीला या गुंतवणुकीशी संबंधित इतर लागू कायदे, नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागेल. एलआयसीसाठी गुंतवणुकीची मर्यादा वाढली आहे. आरबीआयची मंजुरी महत्त्वाची आहे कारण एलआयसी देशातील सर्वात मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांपैकी एक आहे. आता नियामक मंजुरी मिळाल्यानंतर, ती एचडीएफसी बँकेतील आपली एकूण हिस्सेदारी 9.99 टक्क्यांपर्यंत वाढवू शकते. तथापि, या मंजुरीचा अर्थ असा नाही की एलआयसी लगेचच आपली हिस्सेदारी वाढवेल. हे एका प्रक्रियेअंतर्गत वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये होऊ शकते.
एचडीएफसी समभाग वधारला
एचडीएफसी बँकेतील एलआयसीचा हिस्सा वाढवण्यास रिझर्व्ह बँकेने दिलेल्या मंजुरीचा परिणाम गुरुवारी (20 ऑगस्ट) बँकेच्या शेअर्सवर दिसून आला. सुरुवातीच्या व्यवहारात एचडीएफसी बँकेचे शेअर्स 1 टक्क्यांहून अधिक वाढले. बुधवारी हा स्टॉक 720 रुपयांवर बंद झाला. तर गुरुवारी, शेअर 725 रुपयांवर उघडला.