For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सलामीलाच स्टार्क-कमिन्स आमनेसामने

06:51 AM Mar 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
सलामीलाच स्टार्क कमिन्स आमनेसामने
Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आज शनिवारी लढत होणार असून त्यातून आयपीएलचे दोन सर्वांत मोठे करार प्राप्त झालेले ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स आमनेसामने येतील. त्याचबरोबर श्रेयस अय्यर दीर्घकाळ दुखापतींमुळे बाहेर राहावे लागल्यानंतर या सामन्यातून पुनरागमन करणार असून त्याच्यावरही लक्ष केंद्रीत होणार आहे.

 

मागील वर्षी पाठीच्या दुखापतीमुळे संपूर्ण हंगाम गमावल्यानंतर अय्यर केकेआरचे नेतृत्व करण्यासाठी परतला आहे. नुकत्याच मुंबईने मिळविलेल्या रणजी विजेतेपदात वाटा उचलताना 95 धावा करून त्याने चमक दाखवलेली आहे. पण त्याच्या तंदुऊस्तीविषयीचे प्रश्न पाहता तो सर्व सामन्यांसाठी उपलब्ध असेल की नाही हे पाहावे लागेल. यंदाच्या आयपीएलमधील सर्वांत मोठा करार केकेआरने करताना स्टार्कला 24.75 कोटी ऊपयांना करारबद्ध केलेले असल्याने सदर डावखुरा वेगवान गोलंदाज उत्कृष्ट कामगिरी करून दाखविण्याच्या प्रचंड दबावाखाली असेल. केकेआरकडे स्टार्क आणि आंद्रे रसेल हे दोनच अनुभवी वेगवान गोलंदाज आहेत.

Advertisement

मात्र त्यांच्याकडे रेहमानउल्ला गुरबाज, फिल सॉल्ट, व्यंकटेश अय्यर आणि श्रेयस यासारखी फलंदाजीत सशक्त अशी वरची फळी असून अंतिम षटकांत फटकेबाजी करण्याच्या दृष्टीने रसेल-रिंकू सिंगसारखे पर्याय उपलध आहेत. केकेआर आज कोलकातातील फिरकीस पोषक खेळपट्टीकडून सुनील नरेन, वऊण चक्रवर्ती आणि सुयश शर्मा यांना साहाय्य लाभेल अशीही आशा बाळगून असेल.

दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार कमिन्स (ऊ. 20.50 कोटी) हा आयपीएलमधील तिसरा सर्वांत महागडा खेळाडू असून फलंदाजीत ते ट्रॅव्हिस हेड आणि हेनरिक क्लासेनवर अवलंबून असतील, तर गोलंदाजीत कमिन्सला भुवनेश्वर कुमारची साथ लाभेल. फिरकी विभागात वॉशिंग्टन सुंदर आणि वानिंदू हसरंगासारखे महत्त्वपूर्ण पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.

संघ : कोलकाता नाईट रायडर्स-श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा (उपकर्णधार), मनीष पांडे, रमणदीप सिंग, रिंकू सिंग, साकिब हुसेन, अनुकुल रॉय, व्यंकटेश अय्यर, शेरफेन रदरफोर्ड, अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, सुनील नरेन, के. एस. भरत, फिल सॉल्ट, रेहमानउल्ला गुरबाज, वैभव अरोरा, चेतन साकारिया, दुष्मंथा चमीरा, वऊण चक्रवर्ती, मिचेल स्टार्क, मुजीब उर रेहमान, हर्षित राणा आणि सुयश शर्मा.

सनरायझर्स हैदराबाद-पॅट कमिन्स (कर्णधार), अब्दुल समद, अभिषेक शर्मा, एडन मार्करम, ट्रॅव्हिस हेड, वानिंदू हसरंगा, मार्को जॅनसेन, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, हेन्रिक क्लासेन, भुवनेश्वर कुमार, मयंक अग्रवाल, टी. नटराजन, अनमोलप्रीत सिंग, मयंक मार्कंडेय, उपेंद्रसिंह यादव, उमरान मलिक, नितीश कुमार रे•ाr, फजलहक फाऊकी, शाहबाज अहमद, जयदेव उनादकट, आकाश सिंग, जे. सुब्रमण्यन.

वेळ : सायंकाळी 7.30 वा.

Advertisement
Tags :

.