ग्रहांना गिळंकृत केल्यावर तारा झाला ‘हिरवा’
अंतराळात पहिल्यांदाच दिसले असे दृश्य
वैज्ञानिकांनी पहिल्यांदाच अंतराळात हिरव्या रंगाच्या एका ताऱ्याची ओळख पटविली आहे. या ताऱ्याचे नाव डब्ल्यूडी जे1330प्लस6435 आहे. हा पृथ्वीपासून सुमारे 280 प्रकाशवर्षे दूर आकाशगंगा गॅलेक्सीच्या ड्रेको तारामंडळात अस्तित्वात आहे. हा एक पांढरा तारा असून त्याच्या आत अशा ग्रहांचे तुटलेले हिस्से सामावले आहेत, जे कधी याच्या आसपास प्रदक्षिणा घालत होते. वैज्ञानिकांनुसार या हिस्स्यांमधून आलेला सोडियम ाअणि ताऱ्यातील हेलियमदरम्यान होणाऱ्या प्रक्रियेमुळे हा तारा हिरव्या रंगाचा दिसून येतो.
सर्वसाधारणपणे ताऱ्यांचा रंग त्यांच्या तापमानावर निर्भर असतो. थंड तारा नारिंगी, सूर्यासारखा तारा पांढरा आणि अधिक तप्त तारा सौम्य निळ्या रंगाचा दिसून येऊ शकतो. परंतु हा तारा या सर्वांपेक्षा वेगळा आहे. वैज्ञानिकांनी एका अशा पांढऱ्या छोट्या ताऱ्याला पाहिले आहे, जो सौम्य गुलाबी रंगाचा आहे. या शोधांमधून ताऱ्यांमध्ये असलेले वेगवेगळे घटक त्याच्या रंगावर प्रभाव पाडू शकतात हे कळते.
वैज्ञानिकांनी डब्ल्यूडी जे1330प्लस6435 चे अध्ययन केले तेव्हा याच्या बाहेरील हिस्स्यात कॅल्शियम, लिथियम आणि सोडियम यासारखे घटक मिळाले. हे घटक अशा ग्रहांच्या तुटलेल्या हिस्स्यांमधून आले आहेत, जे कधी या ताऱ्याच्या आसपास प्रदक्षिणा घालत होते. काळासोबत या ग्रहांचे हिस्से ताऱ्यामध्ये सामावले गेले, या ताऱ्याच्या हिरव्या रंगामागे सोडियमची खास भूमिका आहे. सर्वसाधारणपणे सोडियम नारिंगी रंगाचा प्रकाश शोषून घेतो. याचमुळे सोडियमयुक्त स्ट्रीटलाइट नारिंगी रंगाच्या दिसून येतात, परंतु या ताऱ्यात सोडियमसोबत काही वेगळेच घडत आहे.
कसा बदलला रंग
वैज्ञानिकांनुसार या ताऱ्यात घनत्व अत्यंत अधिक आहे. येथे सोडियमचे अणू सातत्याने हेलियमच्या अणूंना धडकत राहतात. या धडकांमुळे सोडियमच्या काम करण्याची पद्धत बदलते. यानंतर तो पिवळ्या, नारिंगी आणि लाल रंगाच्या प्रकाशाच्या काही हिस्स्यांनाही शोषून घेऊ लागतो. याचा प्रभाव ताऱ्यातून बाहेर पडणाऱ्या प्रकाशावर पडतो, जेव्हा प्रकाशात वेगवेगळ्या रंगांचे संतुलन बदलते, तेव्हा हा तारा हिरव्या रंगाचा दिसतो. याचा रंग चार्टरेज म्हणवून घेतो, ज्यात हिरव्या रंगासोबत सौम्य पिवळेपणाही असतो. वैज्ञानिकांनुसार सूर्यासारख्या सामान्य ताऱ्यांमध्ये अशाप्रकारचा रंग दिसून येत नाही.
पृथ्वीच्या आकाराचे तारे
पांढरे छोटे तारे कुठल्याही ताऱ्याच्या जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात निर्माण होतात. त्यांचा आकार पृथ्वीच्या आसपास असू शकतो. परंतु यात अत्यंत अधिक पदार्थ भरलेला असतो. सर्वसाधारणपणे एका पांढऱ्या छोट्या ताऱ्यात सूर्याच्या जवळपास निम्म्म्या हिस्स्याइतके द्रव्यमान असू शकते. याचे घनत्व अत्यंत अधिक असल्याने सोडियमचे किंचित प्रमाणही यातून बाहेर पडणाऱ्या प्रकाशावर मोठा प्रभाव पाडू शकते. डब्ल्यूडी जे1300प्लस6435 मध्ये देखील सोडियममुळे नारिंगी प्रकाशाचा मोठा हिस्सा शोषून घेतला जातो. यामुळे ताऱ्याचा रंग हिरवा दिसू लागतो.
एक तारा सौम्य गुलाबी रंगाचा
वैज्ञानिकांनी या अध्ययनात पृथ्वीपासून सुमारे 65 प्रकाशवर्षांच्या कक्षेत असलेल्या 151 पांढऱ्या छोट्या ताऱ्यांच्या रंगांना पाहिले. यात बहुतांश तारे पांढऱ्या रंगाचे होते. परंतु एक तारा सौम्य गुलाबी दिसून आला. याचे नाव डब्ल्यूडी जे1010प्लस2845 आहे. हा पृथ्वीपासून सुमारे 48 प्रकाशवर्षे अंतरावर लियो मायनर तारामंडळात आहे.
या ताऱ्याच्या रंगात बदलाचे कारण सोडियम नाही, तर कार्बन आहे. वैज्ञानिकांनुसार या ताऱ्याच्या आतील कार्बन बाहेर पडला असून ज्यामुळे त्याच्या रंगावर प्रभाव पडतो. अधिक कार्बन युक्त काही पांढरे छोटे तारे गुलाबी किंवा जांभळ्या रंगाचे दिसून येऊ शकतात असे अध्ययनात आढळून आले. तर ग्रहांच्या तुटलेल्या हिस्स्यांमधून आलेले घटकयुक्त काही तारे पिवळ्या रंगाचे दिसू शकतात.
वैज्ञानिकांनी ताऱ्यांमधून बाहेर पडणाऱ्या प्रकाशाचे अध्ययन केले. यासाठी त्यांनी न्यू मेक्सिकोमध्ये असलेल्या टेलिस्कोपमधून प्राप्त आकडेवारी आणि कॉम्प्युटर मॉडेलची मदत घेतली. या दरम्यान 151 पांढऱ्या छोट्या ताऱ्यांचा रंग आणि त्यातील घटकांची माहिती जमविण्यात आली. ताऱ्यांचा रंग केवळ त्यांच्या तापमानामुळे ठरत नाही, तर त्यातील घटक आणि बाहेरील हिस्स्याची रचनाही रंग बदलू शकते असे या अध्ययनातून कळते. डब्ल्यूडी जे1330प्लस6435 अंतराळात हिरव्या रंगाच्या ताऱ्याचे पहिले नोंद उदाहरण आहे.
