‘अल्ट्राटेक’च्या करारानंतर स्टार सिमेंटचे समभाग वधारले
महिन्याभरात स्टॉक 32 टक्क्यांनी मजबूत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आदित्य बिर्ला समूहाची प्रमुख अल्ट्राटेक सिमेंटने शुक्रवारी जाहीर केले की ते स्टार सिमेंटमधील 8.69 टक्के हिस्सेदारी 851 कोटी रुपयांना विकत घेतील. या करारानंतर स्टार सिमेंटचे शेअर्स 8 टक्क्यांनी वाढून 247.75 रुपयांवर पोहोचले.
नवीन वर्षात स्वत:ला आर्थिक वाढीची भेट दिली आहे. अल्ट्राटेकने स्टार सिमेंटचे 3.70 कोटी इक्विटी शेअर्स प्रति शेअर 235 रुपयांपेक्षा जास्त किंमतीला खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. हा करार रोख असेल आणि महिनाभरात पूर्ण होण्याची शक्यता आहे. अल्ट्राटेकला त्याच्या संचालकमंडळाकडून करार मंजूर करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. या संदर्भात एक्सचेंज फाइलिंगमध्ये त्याचा खुलासा केला आहे.
या करारांतर्गत स्टार सिमेंटच्या प्रवर्तक आणि प्रवर्तक गटाने त्यांच्या इक्विटी होल्डिंग्सची विक्री करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे आणि त्यासाठी कंपनीशी संपर्क साधला आहे. यापूर्वी, काही अहवालात असे म्हटले होते की, अंबुजा सिमेंट ईशान्य भारतात आपली उपस्थिती वाढवण्यासाठी स्टार सिमेंट घेण्याचा विचार करत आहे, परंतु स्टार सिमेंटने नंतर या अफवांचे खंडन केले आहे.
दोन वर्षात परतावा दुप्पट
ईशान्य भारतातील सिमेंट बाजारपेठेतील प्रमुख स्टार सिमेंटचा मेघालयमध्ये 7.7 दशलक्ष टन प्रतिवर्ष उत्पादन क्षमता असलेला एकात्मिक प्लांट आहे. गेल्या एका महिन्यात स्टार सिमेंटच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. एका महिन्यात शेअर 33.96 रुपयांपर्यंत वाढला. गेल्या एका वर्षात त्याचा परतावा 34 टक्के असला तरी दोन वर्षात त्याने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे आणि त्यांचे पैसे दुप्पट केले आहेत.
स्टार सिमेंटची कामगिरी
2001 मध्ये स्थापन झालेल्या, स्टार सिमेंटची उलाढाल आर्थिक वर्ष 2024 मध्ये 2,910.66 कोटीची होती, जी आर्थिक वर्ष 2023 मध्ये 2,704.84 कोटी आणि आर्थिक वर्ष 2022 मध्ये 2,221.81 कोटीपर्यंत पोहचली. अल्ट्राटेक ही भारतातील सिमेंट क्षेत्रातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे, तर अदानी समूहाने 2022 मध्ये सिमेंट उद्योगात मोठे व्यवहार केले आहेत.