For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पॅलेस्टाइन मुद्द्यावरील भूमिका कायम! परराष्ट्रमंत्र्यांची पॅलेस्टाइनच्या पंतप्रधानांशी चर्चा

06:33 AM Dec 11, 2023 IST | Tarun Bharat Portal
पॅलेस्टाइन मुद्द्यावरील भूमिका कायम  परराष्ट्रमंत्र्यांची पॅलेस्टाइनच्या पंतप्रधानांशी चर्चा
Advertisement

जयशंकर यांची पॅलेस्टाइनच्या पंतप्रधानांशी चर्चा : हमास लोकांचे अन्न चोरत असल्याचा इस्रायलचा दावा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, जेरूसलेम

विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी पॅलेस्टाइनचे पंतप्रधान मोहम्मद शतयेह यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. यादरम्यान दोन्ही देशांनी परस्परांच्या संपर्कात राहण्याचा आणि चर्चा सुरु ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. पॅलेस्टाइनच्या मुद्द्यावर भारताच्या भूमिकेत कुठलाच बदल झाला नसल्याचे शतयेह यांच्यासमोर स्पष्ट केल्याची माहिती जयशंकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे.

Advertisement

जयशंकर यांनी शतयेह यांनी गाझा आणि वेस्ट बँकेतील स्थितीवर देखील चर्चा केली आहे. तर दुसरीकडे हमासचे दहशतवादी अत्यावश्यक सामग्री गाझाच्या लोकांपर्यंत पोहोचू देत नाहीत, हमासचे दहशतवादी अन्नधान्याची चोरी करत आहेत. तसेच गरजेची सामग्री मिळविण्यासाठी पोहोचलेल्या लोकांना मारहाण करत असल्याचा आरोप इस्रायलकडुन करण्यात आला आहे.

इस्रायलच्या सैन्याने यासंबंधी पुष्टी देणारा एक व्हिडिओ जारी केला असून यात हमासचे दहशतवादी मदतसामग्रीची चोरी करत असल्याचे दिसून येत आहे. गाझाच्या लोकांच्या गरजांपेक्षा अधिक आवश्यक दहशतवाद्यांच्या गरजा असल्याची उपरोधिक टिप्पणी इस्रायलच्या सैन्याने व्हिडिओच्या कॅप्शनदाखल केली आहे.

गाझामध्ये निम्मी लोकसंख्या उपाशी

गाझामधील निम्मी लोकसंख्या म्हणजेच सुमारे 10 लाख लोकांकडे खाण्यासाठी काहीच शिल्लक राहिलेले नाही. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न कार्यक्रमानुसार गाझाची निम्मी लोकसंख्या उपासमारीला तोंड देत आहे. एक महिन्यासाठी गाझाच्या 10 लाख लोकांची भूक मिटविता येईल इतक्या सामग्रीची व्यवस्था करत आहोत असे जागतिक अन्न कार्यक्रमाचे उपसंचालक कार्ल स्काउ यांनी म्हटले आहे.

आणखी दोन महिने चालणार युद्ध

गाझामध्ये इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध आणखी दोन महिने चालण्याची शक्यता आहे. या कालावधीत कुठल्याही प्रकारची शस्त्रसंधी होणार नाही. परंतु इस्रायल ओलिसांच्या मुक्ततेसाठी करार करण्याचे प्रयत्न सुरुच ठेवणार असल्याचे इस्रायलच्या बॉडकास्टिंग अथॉरिटीने नमूद पेले आहे.

अमेरिकेकडून इस्रायलला मदत

अमेरिकेचे सरकार थेट युद्धात सहभागी न होता शस्त्रास्त्रs पुरवून इस्रायलला मदत करत आहे. संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेत शस्त्रसंधीच्या प्रस्तावावर नकाराधिकार वापरल्यावर अमेरिकेने एक विधेयक संमत केले आहे. या विधेयकाच्या मदतीने अमेरिकेकडून इस्रायली रणगाड्यांसाठी दारूगोळा पुरविण्यात येणार आहे. बिडेन प्रशासनाने विधेयक संमत करण्यासाठी आपत्कालीन तरतुदींचा वापर केला आहे. अमेरिकेच्या संसदेत हे विधेयक संमत होण्यापासून रोखण्यात येईल अशी भीती प्रशासनाला होती. अमेरिकेने यापूर्वीच इस्रायलसाटी 110.5 अब्ज डॉलर्सची मदत करण्यासाठीचे विधेयक संमत केले आहे.

खेळण्यांमध्ये शस्त्रास्त्रs लपविण्याचा प्रकार

हमासचे दहशतवादी मुलांच्या खेळण्यांचा वापर शस्त्रास्त्रs लपविण्यासाठी करत असल्याचा प्रकार इस्रायलच्या सैन्याने एका व्हिडिओद्वारे उघड केला आहे. या व्हिडिओत आयडीएफचा एक सैनिक टेडी बियर फाडताना दिसून येतो, यातून एक गन बाहेर काढली जाते.

अरब देश नाराज

सुरक्षा परिषदेतील शस्त्रसंधी प्रस्तावाच्या विरोधात नकाराधिकार वापरण्याच्या अमेरिकेच्या कृतीमुळे अरब देश नाराज झाले आहेत. अमेरिका स्वत:ची जबाबदारी पार पाडण्यास अपयशी ठरला आहे. एका बाजूला शस्त्रसंधी हा शब्द गलिच्छ वाटत असल्याचे उद्गार सौदी अरेबियाचे विदेशमंत्री प्रिन्स फैसल यांनी काडले आहेत. अमेरिकेकडून शस्त्रसंधी रोखण्यात आल्याने मध्यपूर्वेत मोठे स्फोट होतील असा इशारा इराणच्या विदेशमंत्र्यांनी दिला आहे.

Advertisement
Tags :

.