For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्टँडर्ड चार्टर्डचा ताबा कोटक महिंद्राकडे

06:30 AM Oct 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्टँडर्ड चार्टर्डचा ताबा कोटक महिंद्राकडे
Advertisement

मुंबई :

Advertisement

पर्सनल लोनचा व्यवसाय करणाऱ्या स्टॅंडर्ड चार्टर्ड बँकेचा ताबा आता कोटक महिंद्रा बँकेकडे असणार आहे. यासंदर्भातली घोषणा कोटक महिंद्रा बँकेने नुकतीच केली होती. या खरेदी व्यवहारानंतर इंग्लंडमधील स्टॅंडर्ड चार्टर्ड ही संस्था भारतामध्ये वेल्थ आणि इन्व्हेस्टमेंट बँकिंग या व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे.

भारतातील पर्सनल लोनची उलाढाल मजबूत मागणीमुळे अधिक स्पर्धात्मक झाली आहे. मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकांना पर्सनल लोन संदर्भात जास्तीत जास्त निधी राखीव ठेवण्यासंबंधी आदेश दिले होते. वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर जोखीम वाढण्याची शक्यताही त्यावेळी रिझर्व्ह बँकेने व्यक्त केली होती. पर्सनल लोनची वृद्धी ऑगस्टमध्ये वर्षाच्या आधारावर 17 टक्के राहिली आहे, एक वर्षाच्या आधी पाहता ही वाढ 18.3 टक्के होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.