महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मौनी अमावस्येच्या पवित्र स्नानादिवशी चेंगराचेंगरी..

04:19 PM Jan 29, 2025 IST | Pooja Marathe
featuredImage featuredImage
Advertisement

लोकं मरणाच्या दारात...
मराठी तरुणीने केले होते अलर्ट...
प्रयागराज
उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सध्या महाकुंभ मेळावा सुरु आहे. या महाकुंभमेळाव्यात सहभागी होण्यासाठी जगभरातून भाविक येत आहेत. देशविदेशातील नागरिकांसह, भारतातूनही मोठ्या प्रमाणावर पर्यटक पोहचत आहे. साधू संतांची वर्णी लागली आहे. अशा या महाकुंभमेळाव्यात पहाटेच्या सुमारास चेंगराचेंगरी झाल्याने मोठी गडबड उडाली आहे.
मौनी अमावस्येचं निमित्त साधत पवित्र गंगा स्नानासाठी भाविकांनी प्रचंड प्रमाणावर गर्दी केली होती. बघता बघता ही गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांचीही तारांबळ उडाली होती. या चेंगरचेंगरीमध्ये काहींना आपले प्राण गमवावे लागले. एका मराठी तरुणीने आपल्या व्लऑगमधून आधीच याबद्दल अलर्ट केले होते.
किशोरी नावाच्या तरूणीने आपल्या सोशल मिडीयावरून एक व्हीडीओ शेअर केला होता. ती या व्हिडीओसाठी कुंभमेळाव्यात पोहोचली. तिने तेथील भीषण परिस्थिती पाहली. यानंतर तिने आपल्या सोशल मिडीयावरून भाविकांना येथे न येण्याची विनंती केली होती.
मौनी अमावस्येच्या पवित्र स्नानादिवशी महाकुंभमेळाव्याला येऊ नका. इथे प्रचंड गर्दी होत आहे. तरी यायचंच आहे तर अरेल घाट, गंगा घाट, यमुना घाटावर जा. पण संगम घाटावर येऊ नका. पुण्य कमावलं नाही तरी चालेल पण जीव वाचवणं महत्त्वाचे आहे, अशी माहिती देत किशोरीने हा व्हीडीओ शेअर केला होता.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia