महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

निष्काळजीपणा, गैरव्यवस्थापनामुळे चेंगराचेंगरी

06:38 AM Jul 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

परिस्थितीचे आकलन करण्यात अधिकारी अपयशी : हाथरस दुर्घटनेचा एसआयटी अहवाल सादर

Advertisement

वृत्तसंस्था/ लखनौ

Advertisement

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेबाबत पोलीस अनेक पैलूंचा तपास करत आहेत. याप्रकरणी दाखल केलेल्या एसआयटीच्या अहवालात भोले बाबांच्या सत्संगात झालेली चेंगराचेंगरी हे निष्काळजीपणा आणि गैरव्यवस्थापनाचे परिणाम असल्याचे म्हटले आहे. कार्यक्रमासाठी परवानगी घेताना संयोजक समितीने आपल्या स्तरावर संपूर्ण व्यवस्था पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

हाथरसमध्ये सत्संगासाठी जमलेल्या जनसमुदायामध्ये बाबांच्या दर्शनासाठी आलेले नवीन भक्त जास्त होते. यादरम्यान गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. रस्त्यावरील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाची मदत घेण्यात आली. मात्र, गर्दी क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात वाढल्याने चेंगराचेंगरीची दुर्घटना घडल्याचा दावा एसआयटीने आपल्या अहवालात केला आहे. तसेच या दुर्घटनेचा कट रचल्याबद्दल एसआयटीने आपल्या अहवालात पोलीस तपास आणि आयोजकांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

एसआयटीने आपल्या अहवालात असेही नमूद केले आहे की परवानगी देताना एलआययूच्या अहवालात बाबांच्या सत्संगात सेवेदारांकडून संपूर्ण व्यवस्था केली जाईल असे म्हटले होते. मात्र, स्थानिक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला नाही. बाबांचा सत्संग सुरू झाल्यानंतरही लोकांची गर्दी सुरूच राहिली. यादरम्यान घटनास्थळी उपस्थित अधिकारी परिस्थितीचे आकलन करण्यात अपयशी ठरले, असेही एसआयटीने आपल्या अहवालात म्हटले आहे.

सत्संग स्थळी तैनात करण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्तांपैकी मोजकेच पोलीस सत्संगाबाहेर तैनात होते. महामार्ग जाम होऊ नये म्हणून बहुतांश फौजफाटा रस्त्यावर गर्दी नियंत्रण आणि वाहतूक व्यवस्थापन करण्यात गुंतला होता. एसआयटीने आपल्या अहवालात परवानगीच्या अटींचे उल्लंघन केल्याबद्दल तथ्य लपवण्यासाठी आयोजन समितीच्या लोकांना जबाबदार धरले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article