Chandgad Crime | फोटो, व्हिडिओ आणि जीवे मारण्याची धमकी... चंदगडमधील 'त्या' विकृत कृत्याचा पर्दाफाश!
10:08 AM May 13, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
Advertisement
चंदगड - अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला लज्जा वाटेल असे कृत्य करणाऱ्या आसगाव येथील अवधूत शिवाजी गावडे (वय २२) याच्याविरुद्ध चंदगड पोलिसात गुन्हा नोंद झाल्याची माहिती चंदगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निंगापा चौखंडे यांनी दिली.
अवधूत गावडे हा २०२३ पासून पाठलाग करीत होता. तसेच तिला व तिच्या घरच्यांना मारण्याची भीती दाखवत होता. त्याने तिला घरी बोलावून, तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करीत स्वतःच्या मोबाईलमध्ये फोटो व व्हिडिओ काढले. ते फोटो व व्हिडिओ सर्वत्र व्हायरल करण्याची भीतीही त्याने दाखविली. याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे करीत आहेत.
Advertisement
Advertisement