For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Tamil Nadu election results | स्टॅलिन यांचा गड कोसळला, कोलाथूरमध्ये मुख्यमंत्र्यांना पराभवाचा धक्का; 'टीव्हीके'ची मुसंडी

06:34 PM May 04, 2026 IST | NEETA POTDAR
tamil nadu election results   स्टॅलिन यांचा गड कोसळला  कोलाथूरमध्ये मुख्यमंत्र्यांना पराभवाचा धक्का   टीव्हीके ची मुसंडी
Advertisement

               तामिळनाडूत मोठा राजकीय उलथापालथ; एम. के. स्टॅलिन पराभूत?

Advertisement

तामिळनाडू - तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत धक्कादायक घडामोडी समोर येत असून राज्याच्या राजकारणात मोठा उलथापालथीचा संकेत मिळत आहे. सत्ताधारी द्रमुकला मोठा फटका बसल्याचे चित्र असून मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचा पराभव झाल्याची माहिती समोर येत आहे.

प्राथमिक निकालांनुसार अभिनेता विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाने अनपेक्षित कामगिरी करत मोठी आघाडी घेतली आहे. एक्झिट पोलनुसार व्यक्त झालेला कल प्रत्यक्ष निकालातही दिसून येत असल्याचे चित्र आहे.

Advertisement

उपलब्ध आकडेवारीनुसार दुपारी सुमारे पावणे चारपर्यंत टीव्हीके १०७ जागांवर आघाडीवर असून द्रमुक ७२, तर अण्णाद्रमुक ५५ जागांवर आघाडीवर आहे. या निकालामुळे गेल्या दशकभर सत्तेत असलेल्या द्रमुकला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

विशेष म्हणजे, एम. के. स्टॅलिन यांचा कोलाथूर मतदारसंघातून पराभव झाल्याची चर्चा असून त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके पक्षाने शंभरहून अधिक जागांवर आघाडी घेत सत्ता स्थापनेकडे वाटचाल सुरू केल्याचे दिसत आहे. तामिळनाडूच्या राजकारणात अभिनेत्यांच्या यशाचा ट्रेंड पुन्हा अधोरेखित होत असल्याचे या निकालातून स्पष्ट होत आहे.

Advertisement
Tags :

.