उद्धव-राज ठाकरेंना स्टॅलिन यांचा पाठिंबा
06:39 AM Jul 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ चेन्नई
Advertisement
महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्तीवरून झालेल्या वादानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र आले आहेत. आता राष्ट्रीय शिक्षण धोरणातील त्रिभाषिक धोरणाविरुद्ध आघाडी उघडणारे तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या मुद्यावर उद्धव आणि राज यांच्या एकत्र येण्याचे स्वागत करत त्यांना पाठिंबा दर्शवला आहे.
द्रमुक प्रमुख स्टॅलिन हे त्रिभाषिक सूत्राच्या विरोधातील पवित्र्यात आघाडीवर आहेत. नवीन शिक्षण धोरणानुसार, शाळांमध्ये विद्यार्थ्यांना त्यांची मातृभाषा आणि किमान एक अन्य भारतीय भाषा यासह तीन भाषा शिकणे बंधनकारक आहे. केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार तामिळनाडूमध्ये सध्या लागू असलेल्या दोन भाषांच्या धोरणाऐवजी तीन भाषा शिकणे अनिवार्य करून हिंदी लादू इच्छित असल्याचा दावा द्रमुक प्रमुखांनी केला आहे.
Advertisement
Advertisement