सेंट झेवियर्स विजयी
बेळगाव : बेळगाव स्पोर्ट्स क्लब आयोजित हनुमान चषक 16 वर्षाखालील आंतरशालेय मुलांच्या टी-20 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत गुऊवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात सेंट झेवियर्स स्कूल संघाने ब्लूमिंग बर्ड्स स्कूल संघावर 77 धावांनी दणदणीत पराभव केला. यावेळी सेंट्रल स्कूल संघाच्या आऊष काळभैरवला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना सेंट झेवियर्स स्कूल संघाने 20 षटकात, 7 बाद, 127 धावा केल्या. आऊष कालभैरव याने 7 चौकारासह 41, इंदर प्रजापत 20 तर अवधूत काळे 19 धावा केल्या. ब्लूमिंग बर्ड्स संघातर्फे समर्थ कांबळे, यशोधन बागी यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. प्रत्युत्तर दाखल खेळताना ब्लूमिंग बर्ड्स स्कूल संघाने 12 षटकात सर्व गडी बाद 50 धावा जमविल्या. यश देसाई 12 तर यशोधन बागी 15 धावा केल्या. सेंट झेवियर्स स्कूल संघातर्फे अवधूत काळे 3, समर्थ पन्हाळकर व परीक्षीत वांडकर प्रत्येकी 2 बळी घेतले.