फिनिक्स चषक स्पर्धेत सेंट झेवियर्स मुली विजेत्या
साक्षी तोरगल उत्कृष्ट खेळाडू, सारा सौदागर उत्कृष्ट गोलरक्षक
बेळगाव : फिनिक्स स्पोर्ट्स कौन्सिल आयोजित फिनिक्स चषक 17 वर्षाखालील मुलींच्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सेंट झेवियर्सने गतविजेत्या सेंट जोसेफला सडनडेथमध्ये 3-2 असा पराभव करून फिनिक्स चषक पटकाविला. साक्षी तोरगल उत्कृष्ट खेळाडू, सारा सौदागर उत्कृष्ट गोलरक्षक यांना चषक देऊन गौरविण्यात आले. फिनिक्स मैदानावरती खेळविण्यात आलेल्या मुलींच्या पहिल्या उपांत्य सामन्यात सेंट झेवियर्सने फिनिक्स संघाचा 4-1 असा पराभव केला. या सामन्यात 7 आणि 11 व्या मि. ला झेवियर्सच्या वसुंधरा चव्हाणने सलग 2 गोल करून 2-0 ची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 22 व्या मि.ला. वसुंधराच्या पासवर श्रावणी सुतारने 3 गोल केला. तर 28 व्या मि. श्रावणीच्या पासवर ईफा अत्तारने 4 गोल करून 4-0 ची आघाडी मिळविली. 30 व्या मि. फिनिक्सच्या रेशमाने 1 गोल करून 1-4 अशी आघाडी कमी sकली.
दुसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात सेंट जोसेफ कॅम्प सेंट जोसेफ संतीबस्तवाडचा 1-0 असा निसटता पराभव केला. पहिल्या सत्रात दोन्ही संघाना गोल करण्यात अपयश आले. त्यामुळे गोलफलक कोराच राहिला. दुसऱ्या सत्रात 22 व्या मि.ला सेंट जोसेफ बेळगावच्या रिया वाळकेने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर संतीबस्तवाडने गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले. पण त्यांना अपयश आले. अंतिम सामन्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करून सामन्याला सुरूवात करण्यात आली. पहिल्या सत्रात झेवियर्सच्या वसुंधरा चव्हाणला गोल करण्याची संधी दवडली तर जोसेफच्या रिया वाळकेने मारलेला फटका गोल पोस्टला लागून बाहेर गेला. दुसऱ्या सत्रात दोन्ही संघानी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्यांना ते अपयश आले. त्यामुळे पंचानी टायब्रेकर नियमांचा वापर केला.
त्यामध्ये दोन्ही संघाचा गोलफलक 2-2 असा बरोबरीत झाला. झेवियर्सतर्फे वसुंधरा चव्हाण व श्रावणी सुतारी यांनी गोल केले. तर जोसेफतर्फे लक्ष्मी व रिया वाळकेने गोल केले. त्यानंतर पंचानी सडनडेथ नियमाचा वापर केला. त्यामुळे सेंट झेवियर्सने 3-2 अशा फरकाने पराभव करून विजय मिळविला. झेवियर्सतर्फे श्रावणी चव्हाणने गोल केला. सामन्यानंतर प्रमुख पाहूणे अनिल पोतदार, फिनिक्सचे प्राचार्य विद्या वगण्णावर, सेंटे झेवियर्सचे फादर चार्ली ब्राजेस यांच्या हस्ते विजेत्या झेवियर्सला व उपविजेत्या जोसेफला चषक व पदके देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट खेळाडू म्हणून साक्षी तोरगल झेवियर्स, उत्कृष्ट गोलरक्षक सारा सौदागर जोसेफ यांना चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून रॉयस्टीन जेम्स, विष्णू धामणेकर, पवन देसाई, ओमकार शिंदोळकर यांनी काम पाहिले.