महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तिलारी घाटमार्गे एसटी वाहतूक बंद

11:36 AM Jun 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

31 ऑक्टोबरपर्यंत आंबोली घाटमार्गे सुरू राहणार 

Advertisement

दोडामार्ग : काहीशा विश्रांतीनंतर सुरू झालेला मुसळधार पाऊस तसेच सतत होणाऱ्या अपघातांच्या अनुषंगाने राज्य परिवहन महामंडळाने तिलारी रामघाटातून होणारी एसटी बस वाहतूक 31 ऑक्टोबरपर्यंत बंद करून ती आंबोलीमार्गे वळविली आहे. याची अंमलबजावणी सुरू झाली असून बेळगाव, कोल्हापूर, इचलकरंजी,गडहिंग्लज आदी भागात जाणाऱ्या एसटी गाड्या आता आंबोलीमार्गे जाणार आहेत.राज्य परिवहन महामंडळ कोल्हापूर विभाग नियंत्रक यांनी या संदर्भातील पत्र प्रसिद्ध केले आहे. अवजड वाहतुकीसाठी तिलारी घाट बंद करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी चंदगड, कागल, कोल्हापूर, बेळगाव, राधानगरी, गडहिंग्लज आदी भागात जाणाऱ्या एसटी गाड्यांची वाहतूक 31 ऑक्टोबरपर्यंत बंद केली आहे. याठिकाणी जाणाऱ्या बसेस आंबोलीमार्गे जाणार असून त्यांचे सुधारित वेळापत्रक दोडामार्ग बसस्थानकावर प्रसिद्ध केले आहे.

Advertisement

 आंबोलीमार्गे एसटी बसची वाहतूक 

चंदगड आगाराची दोडामार्ग बस दुपारी 2 वाजता चंदगडहून निघणार असून दोडामार्गला 5 वाजेपर्यंत पोहोचेल. त्यानंतर ती सायंकाळी 5.15 वाजता आंबोलीमार्गे बेळगावला रवाना होईल. दुसऱ्या दिवशी बेळगाव-दोडामार्ग ही बस बेळगावमधून सकाळी 7 वा. सुटणार असून दोडामार्ग येथे ती 10.30 पर्यंत पोहोचेल. तीच बस पुन्हा दोडामार्गहून आंबोलीमार्गे चंदगडला मार्गस्थ होईल. बेळगाव-पणजी ही बस बेळगावहून 3.15 वा. सुटणार आहे. ही बस दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वा. पणजीहून आंबोलीमार्गे बेळगावाला मार्गस्थ होणार आहे.

कागल आगाराची कोल्हापूर-पणजी ही बस कोल्हापूर येथून 9.15 वा. सुटणार असून पणजी येथे 1.30 वा. पोहोचणार आहे. कोल्हापूर-पणजी ही कागल आगाराची दुसरी बस कोल्हापूर येथून सकाळी 11 वा. सुटणार असून 2.30 वा. पणजी येथे पोहोचणार आहे. कोल्हापूर आगाराची कोल्हापूर-पणजी ही बस कोल्हापूर येथून दुपारी 1 वा. सुटणार असून पणजी येथे 8 वा. पोहोचणार आहे. कोल्हापूर-दोडामार्ग ही बस कोल्हापूर येथून 4 वा. सुटून 5.45 वा. पोहोचणार आहे. कोल्हापूर-दोडामार्ग ही बस कोल्हापूर येथून सायं. 5 वा. सुटणार असून 06.30 वा. दोडामार्ग येथे पोहोचणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article