For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एसटीची सेवा आज होणार विस्कळीत

11:33 AM Nov 19, 2024 IST | Radhika Patil
एसटीची सेवा आज होणार विस्कळीत
ST services will be disrupted today
Advertisement

कोल्हापूर : 
निवडणूक ड्यूटीवर असणारे कर्मचारी, अधिकारी आणि निवडणूक साहित्य मतदान केंद्रामध्ये पोहोचविण्यासाठी आज, मंगळवारी एसटीच्या 451 बस रवाना होणार आहेत. परिणामी दुपारपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील एसटी सेवा विस्कळीत होणार आहे.

Advertisement

विधानसभेची निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यावर आली आहे. उद्या, बुधवारी मतदान होत आहे. 3 हजार 452 मतदान केंद्र आहेत. हजारो कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या मतदानाच्या प्रक्रियेसाठी नियुक्ती केली आहे. हे सर्व कर्मचारी आज, बुधवारी सकाळी 7 वाजता संबंधित मतदार संघातील निवडणूक कार्यालय येथून मतदानासाठीचे ईव्हीएम मशिनासह अन्य साहित्य घेऊन मतदान केंद्राकडे रवाना होणार आहेत. त्यांना केंद्रापर्यंत जाण्यासाठी एसटीच्या 451 बस घेण्यात आल्या आहेत.

या एसटीच्या बस सकाळी कर्मचारी आणि साहित्य केंद्रावर पोहोचवून दुपारी पुन्हा डेपोत येणार आहेत. एसटीच्या सुमारे 731 बस आहेत. यापैकी एकाचवेळी 451 बस निवडणूक कामासाठी गेल्या मंगळवारी दुपारी 2 पर्यंत एसटीची सेवा विस्कळीत होणार आहे. प्रवाशांनी पर्याय वाहतूक सेवेचा आधार घ्यावा लागणार आहे.

Advertisement

                                                      ‘उत्तर’साठी केएमटीच्या 50 बस
कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या निवडणूक कामासाठी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि मतदानासाठीचे साहित्य मतदान केंद्रात नेण्यासाठी केएमटीच्या 50 बस घेण्यात आल्या आहेत. सकाळी 6 ते दुपारी 2 पर्यंत या बसचा वापर होणार आहे. तसेच बुधवारी दुपारी 4 नंतर मतदान साहित्य व कर्मचाऱ्यांना परत आणण्यासाठीही केएमटीच्या बसचा वापर केला जाणार आहे. या दरम्यान, सर्व मार्गावरील बस फेऱ्यामध्ये कपात केली आहे. परिणामी मार्गावरील बसेस नियमित वेळापत्रकाप्रमाणे धावणार नसल्याने पासधारकांसह प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

Advertisement
Tags :

.