For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चार-पाच दिवसांत येणार ‘एसटी’ आरक्षण अधिसूचना

02:54 PM Jun 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
चार पाच दिवसांत येणार ‘एसटी’ आरक्षण अधिसूचना
Advertisement

आदिवासी कल्याणमंत्री तवडकर यांची माहिती

Advertisement

पणजी : येत्या चार-पाच दिवसांत एसटीसाठी विधानसभा मतदारसंघात राजकीय आरक्षणाची अधिसूचना जारी होऊन त्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचा दावा आदिवासी कल्याणमंत्री रमेश तवडकर यांनी केला आहे. पणजीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुढे सांगितले की, एसटींना आरक्षण देण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून ते आता कायदा झाला आहे. राज्यसभेत, लोकसभेतही त्यास मान्यता मिळाली असून राष्ट्रपतींनीदेखील संमती दिल्याने आता अंतिम अधिसूचना तेवढी जारी होणे बाकी आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेश अध्यक्ष दामू नाईक हे दिल्लीत त्यासाठी प्रयत्न करीत असून त्यास लवकरच यश प्राप्त होईल, अशी आशा तवडकर यांनी व्यक्त केली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत एसटींना राजकीय आरक्षण मिळणार यात शंका नसल्याचे त्यांनी पुढे नमूद केले. येत्या आठवड्यात एसटी प्रतिनिधींचे शिष्टमंडळ दिल्लीत जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

 लवकरच भरणार रिक्त असलेले मंत्रीपद : मुख्यमंत्री

Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे, की आदिवासींना गोवा विधानसभेत जागा राखीव ठेवण्यासाठी आपण केंद्र सरकारकडे प्रयत्न जारी ठेवले आहेत. मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सदस्य रवी नाईक यांचे निधन झाल्यामुळे सदर पद रिक्त झाले आहे, त्यासंबंधी पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारले असता, सदर पद लवकरच भरण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

Advertisement
Tags :

.