महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सेंट पॉल्स, सेंट जोसेफ सर्वसाधारण विजेते

10:17 AM Aug 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मराठा युवक संघ निमंत्रितांची जलतरण स्पर्धा : डीपी, सेंट मेरीज संघ उपविजेते

Advertisement

बेळगाव : मराठा युवक संघ आयोजित आबास्पोर्ट क्लब व हिंद सोशल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 19 व्या आंतरशालेय जलतरण स्पर्धेच सेंटपॉल्सने मुलांच्या गटात 80 गुणासह सर्वसाधारण विजेतेपद 58 गुणासह सेंट मेरीज उपविजेते तर मुलांच्या गटात सेंट जोसेफने 67 गुणासह संघानी सर्वसाधारण विजेतेपद व डीपी 54 गुणासह उपविजेतेपद पटकाविले. हिंदवाडी येथील हिंद क्लबच्या जलतरण तलावात  घेण्यात आलेल्या मराठा युवक संघ आयोजित 19 वी आंतरराज्य आंतरशालेय जलतरण स्पर्धा आबा क्लब व हिंद सोशल क्लब यांच्या सहकार्याने करण्यात आलेल्या स्पर्धेचा बक्षिस समारंभाचे प्रमुख पाहुणे माजी विधान परिषद सदस्य व केएलई संस्थेचे संचालक महांतेश कवटगीमठ उपस्थित होते.

Advertisement

प्रारंभी  सुहास किल्लेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संस्थेची माहिती मराठा युवक संघाचे अध्यक्ष बाबासाहेब काकतकर यांनी दिली. महांतेश कवटगीमठ यांनी  मराठा युवक संघाचे व आबा स्पोर्ट्स क्लब व सर्व  जलतरण पटुंचे अभिनंदन केले. स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकातील 300 ते 400 स्पर्धक भाग घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. बेळगांव शहर हे क्रीडापटू शहर बनत आहे असेही सांगितले. स्पर्धेतील वैयक्तिक विजेत्या खेळाडूंना बक्षीसे  शेखर हंडे, सुहास किल्लेकर, पांडुरंग जाधव, दिनकर घोरपडे, मधू पाटील, विजय बोंगाळे, माऊती देवगेकर यांच्याहस्ते देण्यात आले.  जनरल चॅम्पियनशिप चषक मुलांमध्ये सेंट पॉल स्कुल व उपविजेत्या सेंट मेरीज स्कुल, तर मुलीं गटात सेंट जोसेफ स्कूल व उपविजेत्या डी पी स्कुलला पाहुणे महांतेश कवटगीमठ व बाळासाहेब काकतकर यांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धेचे सूत्रसंचालन आबा क्लबचे विश्वास पवार यांनी केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article